Sextortion | Representational Image (Photo Credits: Pixabay)

'खाया पिया कुछ नही गिलास तोडा बारा आणा' अशीच काहीशी स्थिती ठाणे (Thane Sextortion Case) येथील एका व्यक्तीची झाली आहे. शहरातील एका 39 वर्षीय व्यक्तीला अनोळखी क्रमांकावरुन आलेला व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल तब्बल 6 लाख 50 हजार रुपयांना पडला आहे. इतकेच नव्हे तर शहारीतल एका नामवंतर कॉर्पोरेट कंपनीवर सल्लागार असणाऱ्या या व्यक्तीला बदनामीच्या धमकीलाही सामोरे जावे लागले आहे. या व्यक्तीसोबत सेक्सटॉर्शन (Sextortion) घडले असल्याची तक्रार पीडित व्यक्तीने पोलिसांत दिली आहे. घडल्या प्रकारामुळे परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आरोपींनी पीडिताकडून हे सर्व पैसे 18 मार्च ते 25 मार्च या कालावधीत उकळले.

पीडित व्यक्तीला आलेल्या फोन क्रमांकावरुन आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. मटा ऑनलाईनने दिलेल्या वृत्तानुसार, एक दिवशी अचानक पीडित व्यक्तीस अनोळखी फोन क्रमांकावरुन व्हॉट्सॲप व्हिडीओ कॉल आला. सदर व्यक्तीने उत्सुकतेने फोन स्वीकारला. समोर एक महिला बोलत होती. ही महिला कोण आहे. तिने कशासाठी फोन केला आहे. हे सर्व विचारेपर्यंत या महिलेने अचानक अंगावरील कपडे उतरवले आणि ती नग्न झाली. त्यानंतर या व्यक्तीने तातडीने आपला फोन कट केला. पण, हे प्रकरण इतक्यावर थांबले नाही. (हेही वाचा, Sextortion and Online Blackmailing: सेक्सॉर्शन आणि ऑनलाइन ब्लॅकमेलिंगला कसे सामोरे जावे? Sexual Extortion पासून सुरक्षित राहण्याचा सरकारने सूचवला हा उपाय)

थोड्या वेळाने पीडित व्यक्तीला याच महिलेने त्या नंबरवरुन काही स्क्रिनशॉट पाठवले. हे स्क्रिनशॉट याच व्यक्तीचे होते. अश्लिल होते. थोड्या वेळाने पुन्हा आणखी एका अनोळखी फोन क्रमांकावरुन फोन आला. या व्यक्तीला सांगण्यात आले की, तुमचा व्हिडिओ आमच्याकडे आहे. त्यामुळे आम्ही सांगतो त्या फोन क्रमांकावर फोन करा. यावर पीडित व्यक्तीने त्यानुसार नव्या क्रमांकावर फोन केला. तेव्हा त्या क्रमांकावरुन समोरुन पुरुष बोलत होता. त्याने आपण दिल्ली येथील पोलीस आयुक्त आहोत असे सांगितले. तसेच, हा व्हिडिओ जर सोशल मीडियावर अपलोड होऊ द्यायचा नसेल तर, 6 लाख 50 हजार रुपये देण्याची मागणी केली.

बदनामी टाळण्यासाठी पीडित व्यक्तीने 6 साथ 50 हजार रुपये दिले. पण, हा प्रकार तेवढ्यावरच थांबला नाही. समोरील आरोपींनी पीडिताकडे पैशांची आणखी मागणी केली. पैशांसाठी वारंवार तगादा आणि मागणी वाढल्याने पीडित वैतागला आणि त्याने पोलिसांत तक्रार केली. पीडित व्यत्तीने तक्रारीत दिलेल्या माहितीनुसा, दिल्ली येथील पोलीस आयुक्त अशी स्वत:ची ओळख सांगणाऱ्या त्या व्यक्तीने पीडिताला सांगितले की, सदर महिला सेक्स रॅकेट चालवते. तिच्याकडे चौकशी करताना तुमचा फोन क्रमांक मिळाला. तुमचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होणार होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होऊ द्यायचा नसेल तर, पैसे द्यावे लागतील असे सांगितले.