Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

ठाण्यातील माजीवाडा (Majiwada) येथील उड्डाणपूलावर (Flyover) दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन व्यक्तींचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीच्या मागे बसलेली व्यक्ती जागीच ठार झाली तर दुचाकी चालक जखमी झाला असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेकडून (Thane Municipal Corporation) देण्यात आली आहे. बाईक डिव्हाडरला आदळून हा अपघात झाला, अशी माहिती समोर येत आहे. बुधवारी सकाळी 7 च्या सुमारास माजिवाडा फ्लायओव्हरवर घोडबंदर-नाशिक लेनवर हा अपघात झाला. फहाद शेख (30) असे दुचाकीस्वाराचे नाव असून तो गंभीररित्या जखमी आहे. तर बाईकवर त्याच्या मागे बसलेला अबुझर शेख (28) याचा या अपघातात मृत्यू झाला आहे.  (Road Accident: बंंगळुरु मध्ये ट्रक व कारच्या धडकेतुन भीषण अपघात, गर्भवती महिलेसह 7 जण जागीच ठार)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फहाद हा वेगाने गाडी चालवत होता. मात्र फ्लायओव्हरवरुन जाताना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. बाईक फ्लायओव्हरच्या भींतीला धडकल्याने मागे बसलेला अबुझर फ्लायओव्हरवरुन खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर बाईकचालकाच्या हात-पाय आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत. हे दोघेही मुंब्रा (Mumbra) येथील अमृत नगरचे (Amrut Nagar) रहिवासी होते. या प्रकरणी ठाण्याच्या कासारवडवली पोलिस स्टेशनमध्ये अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ANI Tweet:

काही दिवसांपूर्वीच बंगळुरु येथे ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. यात गर्भवती महिलेचा देखील समावेश होता. कोविड-19 लॉकडाऊन काळात घरी परतणाऱ्या अनेक मजूरांच्या अपघाताच्या घटना समोर आल्या. दरम्यान, अपघाताच्या बातम्या देशातील अनेक ठिकाणांहून वारंवार कानी येत असतात. अपघात टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वेगावर नियंत्रण, हेल्मेटचा वापर आणि इतर वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात टाळण्यास नक्कीच मदत होईल.