ठाणे: वाघबीळ खाडीजवळ सापडला अज्ञात मृतदेह; पोलीस तपास सूरु
प्रातिनिधिक प्रतिमा (File Image)

ठाणे (Thane) येथील वाघबीळ खाडी (Waghbil Creek) जवळील परिसरात एक अज्ञात मृतदेह सापडल्याने आसपासच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. आज, 28 डिसेंबर रोजी सकाळी हा मृतदेह प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन  विभागाच्या ( Regional Disaster Management Cell) कार्यकर्त्यांना सापडला त्यानंतर ताडीने ठाणे पोलिसांशी संपर्क साधून त्यांनी ही बॉडी तपासासाठी पाठवली. अद्याप या व्यक्तीची ओळख पटण्याचा काहीच मार्ग सापडत नसून पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहेत. तूर्तास हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून याबाबतचा अहवाल मिळताच मृत्यूचे कारण समजण्यास मदत होईल. दिल्ली: हुंड्याच्या मागणीतून गर्भवती विवाहितेची हत्या; नवऱ्यानेच डोक्यात गोळी घालून बिल्डींगच्या गच्चीतून फेकले खाली

ANI वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, वाघबीळ खाडी परिसरात हा मृतदेह सापडला तेव्हा त्याच्या आजूबाजूला ओळख पटवून देईल असं काहीही उपलब्ध नव्हतं मात्र हा कोणीतरी स्थानिकच असून हे प्रकरण आत्महत्येचे असेल असा अंदाज बांधला जात आहे.

ANI ट्विट

दरम्यान, काही दिवसांपूर्वी ठाणे येथे तलावपाळी परिसरात एका तरुणीचे मृतदेह देखील असेच अचानक सापडले होते. या तरुणीने तलावात उडी मारून जीव दिल्याचे तपासात समोर आले होते. तर माहीमच्या समुद्र किनाऱ्यावर देखील एका बेवारस सुटकेसमध्ये पुरुषाच्या हातपायांचे तुकडे आढळल्याची घटना देखील अलीकडेच समोर आली होती. ठाणे यथे घडलेल्या या लागोपाठ घटनांवरून पोलिसांच्या कामावर प्रश्न केले जात आहेत.