A part Khartan Road in Thane West caved in (Photo Credits: ANI)

मुंबईसह ठाणे, पालघर आणि नवी मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. तर ठाण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खारटण रोड येथील शितला मंदिराजवळचा एक भाग कोसळल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोणतीही जिवतहानी किंवा कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी अधिक तपास केला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.(Mumbai Rain: मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे पवई तलाव ओव्हरफ्लो!)

मुंबईसह कोकणात सुद्धा मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बहुतांश ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तर सखल ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहतुक कोंडी झाल्याची समस्या सुद्धा उद्भवल्याचे दिसून आले आहे. तर आयएमडी यांनी शहरासह उपनगरात पुढील 24 तास अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा दिला आहे.(Mumbai Rains: मुसळधार पावसामुळे कुलाबा येथील सखल भागात पाणी साचल्याने मच्छिमारांची स्थानिक प्रशासनाकडे मदतीसाठी मागणी)

तर कुलाबा येथे 129.6mm च्या पावसाची गेल्या 24 तासात नोंद करण्यात आली आहे. तर सांताक्रुझ येथे 200.8mm पावसाची नोंद करण्यात आली आहे. ठाण्यासह कोकणामधील सिंधुदुर्ग येथे सुद्धा मुसळधार पाऊस झाला आहे. तर विदर्भातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. तर दाटीवाटीने असलेल्या क्षेत्रात वीजांच्या गडगडांसह पाऊस पडण्याची शक्यता आयएमडी यांनी व्यक्त केली आहे.