Mumbai Rains: मुसळधार पावसामुळे कुलाबा येथील सखल भागात पाणी साचल्याने मच्छिमारांची स्थानिक प्रशासनाकडे मदतीसाठी मागणी
Mumbai Rains (Photo Credits-ANI)

मुंबईसह उपनगरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळेच विविध ठिकाणी पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान समुद्राच्या किनारी हाय टाइडचा (High Tide) इशारा देण्यात आल्याने तेथे राहणाऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे. कारण हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 1-2 दिवस मुंबईत अतिवृष्टीचा अंदाज व्यक्त केला आहे. याच दरम्यान आता कुलाबा परिसरात राहणाऱ्या मच्छिमारांची चिंता वाढली आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी साचण्यासह सध्याच्या परिस्थितीबाबत मच्छिमारांनी स्थानिक प्रशासनाकडे मदतीसाठी मागणी केली आहे.(High Tide 5 July Time: मुंबईत आज दुपारी पुन्हा समुद्रात भरती, 4.63 मीटर उंच लाटा उसळणार- BMC)

कुलाबा येथे राहणाऱ्या मच्छिमारांच्या घरात गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाणी शिरले आहे. घरात पाणी खुसल्याने मच्छिमारांनी चिंता व्यक्त केली आहे. यासाठी स्थानिक प्रशासनाने त्यांची या स्थितीत मदत करावी अशी मच्छिमारांनी अपेक्षा केली आहे. कारण मच्छिमार ज्या ठिकाणी राहतात तो भाग सखल असल्याचे ही त्यांनी म्हटले आहे.(Monsoon Safety Mumbai: मुंबईत पावसाचा जोर कायम; अंधेरी, चेंबूर, धारावी, वडाळा, मालाड, दहिसर यांसह अनेक भागात वाहतूक बंद)

Tweet:

Video:

तर मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई, पालघर परिसरात शुक्रवारी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईतील हिंद माता, वरळी, प्रभादेवी, मालाड या सारख्या परिसरात पाणी साचल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह उपनगरात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नागरिकांनी अत्यावश्यक काम असल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन ही करण्यात आले आहे.