Suicide Attempts: ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने सोमवारी, 30 जुलै रोजी सकाळी कल्याण येथील राहत्या घरी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीकडून सतत होणाऱ्या छळामुळे त्याने हे टोकाचं पाऊल उचलले. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पत्नीने मानसिक छळ दिल्यामुळे पोलीस कर्मचारांने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आठ महिन्यांपुर्वी या दोघांच लग्न झालं होत.
महात्मा फुले पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक ए.बी.होनमाने यांनी सांगितले की, "पोलीस कॉन्स्टेबल विकास माने यांनी कल्याण (पश्चिम) येथील बिर्ला कॉलेज रोडवरील शंकेश्वर कृपा इमारतीतील राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलीसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतला. पोलीसांनी या संदर्भात चौकशी सुरु केली.
पत्नीच्या छळामुळे उचलेले टोकाचं पाऊल
स्त्रोताकडून मिळालेल्या माहितीनुसार माने आणि त्यांच्या पत्नीमध्ये घरगुती कारणावरून नेहमी वाद होत होता. माने यांना त्यांच्या पत्नीकडून वारंवार धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप माने यांच्या कुटुंबीयांनी आणि नातेवाईकांनी केला आहे. माने हा खंबीर माणूस होता, मात्र पत्नीच्या सततच्या दबावामुळे त्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाइकांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे ठाणे पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. माने यांच्या नातेवाईक आणि कुटुंबीयांकडून आलेल्या तक्रारीच्या आधारे आम्ही माने यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. माने हे कुटुंबासह राहायचे. आम्ही या प्रकरणाचा अधिक तपास करत आहोत. अशी माहिती पोलिस अधिकारांकडून मिळाली आहे.