
Thane: ठाणे येथील भिवंडी मध्ये अर्धवट कोसळलेल्या अनधिकृत इमारतमध्ये सेल्फी घेणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाचा कोसळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी असे म्हटले की, अल्पवयीन मुलाचा तोल जाऊन तो इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडला. मृत मुलाचे नाव मोहम्मद शेख असे असल्याचे सांगण्यात आले आहे.(वरळीतील गॅस सिलिंडर फुटल्यामुळे लागलेल्या आगीत मृतांची संख्या 3 वर, 25 वर्षीय महिलेचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू)
शांती नगर पोलिसांकडून या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. पोलिसांनी अधिक माहिती देत असे म्हटले की, भिवंडीतील पिरानीपाडा येथील ही दुमजली इमारत होती. या इमरातीचा काही भाग भिवंडी निजामपूर शहर महापालिकेकडून गेल्या वर्षात पाडण्यात आला होता. तेव्हा पासून ती इमारत खाली असून तेथे कोणताही सिक्युरिटी गार्ड सुद्धा नसतो.(Aurangabad: औरंगाबादेत प्रेमविवाह केल्याच्या रागातून भावाने बहिणीची केली हत्या)
इमारतीत कोणतीही नसल्याने मुले सहजपणे तेथे जाऊन खेळतात. मोहम्मद हा सुद्धा त्या मुलांपैकी एक होता जो तेथे सोमवारी खेळण्यासाठी इमारतीच्या दुसऱ्या आला होता. मोहम्मद हा सेल्फी काढण्यासाठी टेरेसच्या किनाऱ्यालगतच उभा होता. त्याचवेळी अचानक त्याला तोल जात तो खाली पडला असता त्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तातडीने त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.