ठाणे येथील मेंटल हॉस्पीटलमध्ये (Thane Mental Hospital) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे तिच्या कुटुंबीयास आणि सदर महिलेस हा आनंदाचा क्षण पाहायला मिळाला, अशी माहिती माहिती रुग्णालयातील अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. जवळपास 30 दशकांपूर्वी सदर महिलेचा 13 वर्षांच्या मुलचा विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. मुलाच्या निधनानंतर ही महिला अत्यंत नैराश्येत गेली. पूत्रवियोगाचे दु:ख सहन न झाल्याने या महिलेस डिप्रेशनचा त्रास उद्भवला. त्यातूनच ती मनोरुग्ण झाली आणि घरातून बेपत्ता झाली.
नाशिक पोलिसांना विपन्नावस्थेत सापडली महिला
घरातून बेपत्ता झालेली सदर महिला नाशिक येथील पंचवटी परिसरात विपन्नावस्थेत भटकत होती. दरम्यान नाशिक पोलिसांना ती रेल्वे स्टेशन परिसरात आढळून आली. तिच्याकडे विचारपूस केली असता तिला काहीही अठवत नव्हते. त्यामुळे तिला पुढे मानसिक उपचारांसाठी ठाणे येथील मेंटल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. पुढे वैद्यकीय तपासणीत तिला स्मृतीभंश झाल्याचे निदान झाले. पाठिमागील प्रदीर्घ काळापासून तिच्यावर उपचार सुरु होते. अथक प्रयत्नांनंतर तिची स्मृती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे कर्मचाऱ्यांना जाणवले. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे नाव, गाव, पत्ता यांबाबत विचारपूस करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तपशील जुळविण्यास अडचण निर्माण झाली. मात्र, हळूहळू तिचा ठावठिकाणा शोधण्यास यश आले. (हेही वाचा, Mumbai-Jaipur Train Firing: माजी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरी यास Thane Mental Hospital येथे पाठवण्याचे कोर्टाचे आदेश)
अहमदनगर पोलिसांमुळे नातेवाईकांचा शोध
महिलेसोबत साधलेल्या संवादात कर्मचाऱ्यांना प्रथमच कळले की, तिचे मूळ अहमनदनगर जिल्ह्यातील आहे. त्यानंतर रुग्णालाने अहमदनगर पोलिसांशी संपर्क साधला आणि महिलेच्या गाव आणि नातेवाईकांबद्दल तपशील जमविण्यास सुरुवात केली. एका क्षणाला सर्व तपशील जुळून आला आणि महिलेची ओळख पटली. माहिती मिळाल्यानंतर, महिलेच्या कुटुंबातील सदस्यांनी, ज्यात तिची सून, चुलत भाऊ आणि पुतण्या यांचा समावेश होता, 17 जानेवारी रोजी येथील रुग्णालयात भेट दिली आणि 30 वर्षांत पहिल्यांदाच तिला भेटले.
दरम्यान, ठाणे जिल्ह्यात असलेले ठाणे मानसिक रुग्णालय (मेंटल हॉस्पील) हे या भागातील सर्वात जुन्या आणि सर्वात महत्त्वाच्या मानसिक आरोग्य सुविधांपैकी एक आहे. सन 1861 मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचा मानसिक आरोग्याच्या विविध समस्या असलेल्या व्यक्तींसाठी विशेष काळजी प्रदान करण्याबाबत प्रदीर्घ अनुभव आहे. हे रुग्णालय महाराष्ट्र आरोग्य विभागांतर्गत सरकारद्वारे चालवली जाणारी संस्था आहे, जी आर्थिक स्थितीची पर्वा न करता मानसिक आरोग्य सेवा सर्वांसाठी उपलब्ध असल्याचे सुनिश्चित करते.