ठाण्यामध्ये (Thane) एका व्यक्तीला कोविड 19 लसीऐवजी रेबिजची लस दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये कळवा (Kalwa) येथील हॉस्पिटलचा एक मेडिकल ऑफिसर आणि नर्स निलंबित करण्यात आली आहे. अधिकार्यांच्या माहितीनुसार, Atkoneshwar Healthcare Centre मध्ये दोन अधिकार्यांनी कोणतेही केस पेपर न पाहता कोविशिल्ड घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीला Anti-Rabies Vaccine (ARV) दिली. नक्की वाचा: Uttar Pradesh: एका व्यक्तीला 5 मिनिटांच्या अंतराने दिले कोविड-19 लसीचे दोन्ही डोस .
ठाणे महापालिकेच्या अधिकार्यांच्या माहितीनुसार, ज्या व्यक्तीला हा चुकून डोस देण्यात आला त्याच नाव राजकुमार यादव आहे. सोमवारी तो कोविशिल्ड घेण्यासाठी आला होता. 'हॉस्पिटल मध्ये येताच त्याला मेडिकल हेल्थ ऑफिसर डॉ. राखी तावडे या लसीबद्दल विचारणा करताना दिसल्या. तावडे यांनी देखील केस पेपर न पाहता तसेच कोणत्या लसीच्या डोससाठी आल्या आहेत हे न विचरता थेट अॅन्टी रेबिज लसीच्या रांगेत त्यांना उभं केलं.' अशी माहिती Additional Municipal Commissioner Sandeep Malvi यांनी इंडियन एक्सप्रेस सोबत बोलताना दिली.
45 वर्षीय राजकुमार यादव यांच्यावर काही दिवसांपूर्वीच लोअर बॅक वर सर्जरी झाली होती. त्यामुळे त्यांना कोविड 19 ची लस मिळेल का? याची चौकशी करण्यासाठी ते गेले होते. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार त्यांच्या दोन्ही दंडांवर लस देण्यात आली.
यादव देखील सांगितल्याप्रमाणे ARV च्या रांगेत उभे राहिले. नंतर नर्स किर्तीने देखील काहीच न पाहता लस दिली. दरम्यान यादव यांची स्थिती स्थिर आहे. त्यांच्यावर लसीचा कोणताही दुष्परिणाम आढळलेला नाही.
ठाण्यात कोविड 19 लसीचे घोळ होण्याची ही पहिलीच वेळ नव्हे. ऑगस्ट महिन्यातही काही लसीचे डोस गायब झाले होते ते मुंब्रा मध्ये एका हेअर ट्रांस्प्लंट क्लिनिक मध्ये आढळले.