ठाणे:  प्रियकरासोबतचा Nude Video पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या नवऱ्याकडून बायकोची हत्या
Crime | (Photo Credits: PixaBay)

भिवंडी येथील स्थानिक रहिवासी असलेल्या एका 50 वर्षीय व्यक्तीने आपल्याच बायकोची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. कारण नवऱ्याने बायकोचा प्रियकरासोबतचा न्यूड व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्याचे पाहिले. यामुळे त्याने आपल्या बायकोला जीवे ठार मारले आहे. तर आरोपी नाव रफिक मोहम्मद युनुस असून त्याला पोलिसांनी अटक करण्यापूर्वी  तो त्यांना शरण गेला.(जळगाव: माजी महापौर अशोक सपकाळे यांंचा मुलगा राकेश सपकाळे चा निर्घुण खून)

विवाहित दांपत्य हे भिवंडी येथील अन्सारी नगर परिसरात राहणारे आहे. या दोघांना तीन मुले सुद्धा आहेत. तर पती रफिक हा उर्जा यंत्रणेशी निगडीत काम करतो. परंतु कोरोना व्हायरसमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे त्याला आपली नोकरी गमवावी लागली. यामुळे त्याची बायको नसरिन ही  आपल्या तीन मुलांसह नागाव परिसरात राहणाऱ्या  आपल्या बहिणीकडे राहण्यासाठी गेली.(Pimpri-Chinchwad Murder: पिंपरी- चिंचवड येथे दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाकडून वडिलांची हत्या)

पोलिसांनी या प्रकरणी असे म्हटले की, नवऱ्याने बायकोचा न्यूड व्हिडिओ प्रियकरासोबत पाहिला. सद्दाम अशी प्रियकराची ओळख ही त्याने काढली. यावर संतप्तलेल्या नवरा तिला भेटण्यासाठी गेला आणि तेथेच त्याने तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर नवरा चाकू घेऊन स्थानिक पोलीस स्थानकात पोहचला. शांति नगर पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस अधिकारी ममता डिसोजा यांनी म्हटले की, बायकोचा सोशल मीडियात प्रियकरासोबतचा न्यूड व्हायरल झाल्याने नवऱ्याला अत्यंत वाईट वाटले. त्यामुळेच त्याने बायकोची हत्या केल्याचे सांगितले आहे.