Thane: घोडबंदर रोड येथील सोसायटीच्या गेट मध्ये अडकून पडलेली दोन हरणं बाहेर काढण्यासाठी वनविभागाचे अथक प्रयत्न (Watch Video)
Deer Strayed At Thane Housing Society (Photo Credits: Twitter)

ठाणे (Thane) येथील घोडबंदर रोडवरील (Ghodbunder Road)  हाऊसिंग सोसायटीच्या मुख्य गेट मधून आत शिरण्याच्या प्रयत्नात असताना दोन हरीणे (Deer)  अडकून पडल्याची घटना समोर येत आहे. लोखंडी गेटच्या सळ्यांमधल्या अरुंद जागेत अडकून पडल्याने या हरिणांना किंचित जखम सुद्धा झाली आहे. या बदल इमारतीतील रहिवाशांनी ठाणे येथील प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला (आरडीएमसी) माहिती दिली होती. यानुसार, आरडीएमसीचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि हरिणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न आरंभण्यात आले. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, साधारणतः हरणं नेहमी कल्पनाच फिरतात बहुदा हे दोघे कळपातून वाट चुकून वेगळे पडले असणार आणि त्याच वेळी हरवून ते रहिवाशी भागात आले असणार असे अंदाज आहेत. मुंबई: पवई येथे हनुमान टेकडी परिसरात घराचे छप्पर तुटून हरीण खाली कोसळले; वन्य विभागाच्या अधिकार्‍यांनी केली सुटका(Watch Video)

प्राप्त माहितीनुसार, सकाळी 6 च्या सुमारास दुसरा हरीण त्याच गृहनिर्माण संस्थेच्या मुख्य गेट मध्ये अडकला होता, या दोन्ही हरिणांचे वय साधारण एक वर्ष असेल. खूप वेळ बचावकार्य करून त्या दोघांनाही बाहेर काढण्यात आले. त्यांना बारच रक्तस्त्राव होत असल्याने तातडीने मुंबईतील बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात हलविण्यात आले.  ठाणे शहरातील रस्त्यांवर फिरतोय Leopard? जाणून घ्या 'या' Viral Video मागील सत्य

इमारतीच्या गेट मध्ये अडकलेले हरीण, पहा व्हिडीओ

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुंबईच्या पवई (Powai) परिसरातील हनुमान टेकडी येथे एका घराच्या सिमेंटच्या छप्परावरून घसरुन चक्क हरीण घरात कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती. लॉकडाउन काळात अनेक प्राणी हे रहिवाशी भागात मुक्त संचार करताना आढळले आहेत.