Thane Fire: नौपाडा परिसरात Under Construction इमारतीच्या टेरेसला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
Thane Fire | Photo Credits: Twitter / ANI

ठाणे (Thane)  परिसरातील नौपाडा (Naupada)  भागात एका निर्माणाधीन (Under Construction) इमारतीच्या टेरेसला आग लागली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी 4 फायर  इंजिन्स, 2 रेस्क्यू व्हेईकल्स आणि एक जम्बो टॅंकर रवाना झाला आहे.  अद्याप आग लागण्याचं नेमकं कारण समजू शकले नसले तरीही प्रशासन, पोलिस अधिकारी सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. एआयआयने केलेल्या ट्वीट नुसार ठाण्यातील नौपाडा भागात एक बहुमजली इमरतीवर टेरेसच्या भागात ही  आग लागली आहे. दरम्यान ही इमारत अंडर कंस्ट्रक्शन असल्याने बांबू आणि इतर समान आगीमध्ये पेटले आहे. त्यामुळे आग भीषण स्वरूप धारण करण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. Mumbai Fire: मुंबईतील घाटकोपर परिसरातील बांबू गोदामाला भीषण आग

अंडर कंस्ट्रक्शन असणारी ही इमारत 23 मजल्याची आहे. दरम्यान हिंदुस्थान टाईम्सला अग्निशमन दलाच्या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून अर्धा तासामध्ये आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश येईल आणि आग संपूर्णपणे विझलेली असेल अशी आमची अपेक्षा आहे.

ANI Tweet

काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये जीएसटी भवन इमरातीला देखील दुपारच्या वेळेस आग लागली होती. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती. मात्र आग भीषण असल्याने वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली होती.  भाजप नेते प्रवीण छेडा यांनी या घटनेमागे काहीतरी शिजतंय अशी शक्यता वर्तवली होती.  या इमारतीत आर्थिक कामाशी संबंधित कागदपत्रे आहेत त्यामुळे कोणालातरी कोणत्यातरी घोटाळ्यातून वाचवण्यासाठी सरकारने ही आग स्वतःच लावून दिली नाहीये ना? असाही सवाल प्रवीण यांनी केला होता.