भिवंडी (Bhiwandi) येथील खोका कंपाऊंड ( Khoka Compound AT Bhiwandi) परिसरात असलेल्या एका कारखान्याला मोठी आग ( Fire) लागली आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. दरम्यान, आज शुक्रवार असल्याने कारखान्यातील बहुतांश कामगार हे नमाजसाठी गेले असल्याने संभाव्य धोका बऱ्याच प्रमाणात टळला आहे. मात्र, आगिमध्ये कारखान्यातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली याबबत माहिती मिळू शकली नाही.
आजच्या घटनेआधीही भिवंडीत यापूर्वीही आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये जीवीत आणि वित्त हानी घडल्याचेही अनेकदा समोर आले आहे. भिवंडी येथे मोठ्या प्रमाणावर कारखाने, माल साठवून ठेवणारी गोदामे आणि छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे अनेक उद्योग आहेत. त्यामुळे इथे ज्वालाग्राही पदार्थांचा साठाही मोठ्या प्रामाणावर असतो. (हेही वाचा, पुणे: बाणेर येथील पॅनकार्ड क्लब इमारतीला भीषण आग; अग्निशमन दलाच्या 2 गाड्या घटनास्थळी दाखल)
एएनआय ट्विट
Maharashtra: Fire breaks out at a cloth godown in Bhiwandi. 4 fire tenders present at the spot. pic.twitter.com/TNBe1ACExZ
— ANI (@ANI) January 10, 2020
गेल्या काही दिवसांमध्ये भिवंडीमध्ये आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. त्यामुळे आग तातडीने आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक असणारी सामग्री आणि यंत्रणा भिवंडी परिसरात मोठ्या प्रमाणावर उभारावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.