COVID-19 चे नियम धाब्यावर बसवत ठाण्यात सुरू असलेल्या  डांस बार प्रकरणी नौपाडा, वर्तक नगर पोलिस स्टेशन हद्दीतील 2 सिनियर इन्सपेक्टर निलंबित, 2 ACP ची बदली
Maharashtra Police | (File Photo)

कोरोना संकटामध्ये कडक निर्बंध असताना ठाण्यामध्ये (Thane) डांस बार मध्ये छमछम सुरू होती. एका मराठी वृत्तवाहिनीने या प्रकाराचे स्टिंग ऑपरेशन जारी करताच प्रशासन खडबडून जागे झाले आहे. ठाण्यामध्ये नौपाडा (Naupada Police Station) आणि वर्तक नगर पोलिस स्टेशन (Vartak Nagar Police Station) मध्ये 2 सिनिअर इन्सपेक्टर्सना या प्रकरणी निलंबित करण्यात आले आहे तर 2 एसीपी दर्जाच्या पोलिस कर्मचार्‍यांची बदली झाली आहे.

कोरोना संकटात कडक नियमावली सरकार कडून जारी करण्यात आली आहे. अशामध्ये डान्स बार सुरू असून तेथे कोविड नियमांची पायमल्ली होत असताना स्टिंग ऑपरेशन मध्ये दिसली आहे. दरम्यान डांस बार सुरू असल्याचा प्रकार स्टिंग ऑपरेशनच्या फूटेजनंतर प्रकाशात आला आहे. (हेही वाचा-मुंबईत पुन्हा एकदा छमछम वाजणार, डान्सबारवरील जाचक अटी सुप्रीम कोर्टाकडून रद्द ).

ठाण्यात नौपाडा पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन डांस बार होते तर वर्तक नगर पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक डान्स बार होता. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्याच्या डीजीपींना या प्रकरणाचा तपास करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ठाणे पोलिस कमिशनर ऑफिस कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, नौपाडाचे सिनियर पोलिस इन्सपेक्टर अनिल मांगले आणि वर्तक नगरचे संजय गायकवाड यांना निलंबित करण्यात आले आहे. तर नौपाडा च्या एसीपी नीता पडवी आणि वर्तक नगरचे एसीपी पंकज शिरसाट यांना कंत्रोल रूमला बदली करण्यात आले आहे. ठाणे कमिशनर जय जीत सिंह यांनी Amrapali, Antique Palace आणि Natraj bars यांचा परवाना रद्द केला आहे.