Coronavirus Cases (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोविड19 च्या रुग्णालयासह आरोग्य केंद्रात अतिरिक्त 300 बेड्सची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्हाचे आरोग्य अधिकारी मनीष रेगे यांनी शनिवारी असे म्हटले की, कोविड19 च्या रुग्णांसाठी लवकरात लवकर 500 अधिक बेड्सची उपलब्धता करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे ठाण्यातील ग्रामीण क्षेत्रातील बेड्सची संख्या 2 हजार ऐवढी होईल. त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, जिल्हा सिव्हिल रुग्णालय आणि भिवंडीत आयजीएम रुग्णालाच्या व्यतिरिक्त ठाण्यातील अन्य सरकारी रुग्णालयात अतिरिक्त बेड्सची उपलब्धता करुन दिली आहे.(Lockdown In Kalyan-Dombivali: कल्याण-डोंबिवलीत येत्या 19 जुलै पर्यंत लॉकडाऊन कायम राहणार, KDMC महापालिकेचे आदेश)

ठाण्यातील ग्रामीण भागात आतापर्यंत कोरोनाच्या रुग्णांचा आकडा एकूण 2819 वर पोहचला आहे. तसेच 78 जणांचा कोविडमुळे बळी गेला आहे. अधिकाऱ्यांनी पुढे असे ही म्हटले आहे की, ग्रामीण क्षेत्रात मृत्यूदर 2.77 टक्के तर रिकव्हरी रेट 34.69 टक्के आहे. याच दरम्यान लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने एकाच दिवसात तब्बल 1.50 लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.(Lockdown in Thane: ठाणे राहणार आणखी 7 दिवस बंद; TMC परिसरात 12 जुलै 2020 ते 19 जुलै दरम्यान लॉक डाऊन जाहीर)

दरम्यान, ठाणे जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे  येत्या 12 जुलै ते 19 जुलै पर्यंत लॉकडाऊनचे आदेश देण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. परंतु लॉकडाऊनच्या काळात फक्त  घरकाम करणाऱ्या व्यक्तींना कामावर जाण्याची मुभा देण्यात आली आहे. दरम्यान याआधी पुणे, औरंगाबाद, नांदेड याठिकाणी लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, काल ठाणे महानगरपालिकेत 348 रुग्णांची नोंद झाली असून, एकूण रुग्णांची संख्या 4747 वर पोहोचली आहे.