ठाणेसह (Thane) आजुबाजूच्या परिसरात मध्यरात्री पासून मुसळधार पावसाने (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. ठाणे शहर वाहतूक विभागाकडून (Thane Police Traffic Department) वाहतूकीसंबंधी महत्वाच्या सुचना जारी करण्यात आल्या आहेत. पुढील 2-3 दिवस सतत चालू असणाऱ्या पावसामुळे शक्य असल्यास रस्ते वाहतुकीचा सध्या वापर न करता रेल्वे वाहतुकीचा पर्याय निवडल्यास वाहतूक कोंडी मध्ये अडकणार नाही व आपला अमूल्य वेळची बचत होईल असे वाहन ठाणे वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
खारेगावखाडी ब्रिज आणि साकेत ब्रिज येथे पडलेल्या खड्यामुळे सध्या वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.त्याचप्रमाणे हवामान खात्याने अतिवृष्टी पावसाचा देखील इशारा दिलेला आहे.सतत मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे खड्डे बुजवून संबंधित यंत्रणा तूर्तास लागलीच शक्य होणार नाही यामुळे दैनंदिनरित्या1/3 pic.twitter.com/kzEHZtGUnM
— Thane City Police (@ThaneCityPolice) September 16, 2022
रस्तेवाहतुकीचा वापर करनाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना मोठया वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठाणे शहर वाहतूक विभाग अहोरात्र परिश्रम घेऊन वाहतूक नियमन करीत आहे, परंतु सध्याच्या नैसर्गिक परिस्थिमुळे सर्व बाब नियंत्रणात ठेवणे तूर्तास अशक्य आहे याकरिता.2/3
— Thane City Police (@ThaneCityPolice) September 16, 2022
ठाणे शहर वाहतूक विभाग सर्व नागरिकांना आव्हान करीत आहे की, पुढील २-३ दिवस सतत चालू असणाऱ्या पावसामुळे आपण शक्य असल्यास रस्ते वाहतुकीचा सध्या वापर न करता रेल्वे वाहतुकीचा पर्याय निवडल्यास, आपण वाहतूक कोंडी मध्ये अडकणार नाही व आपला अमूल्य वेळ आणि इंधन याची देखील बचत होईल.3/3
— Thane City Police (@ThaneCityPolice) September 16, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)