Thane Building Slab Collapse Update: राबोडी येथे घराचा स्लॅब कोसळून 2 जणांचा मृत्यू तर 10 वर्षीय मुलगी जखमी
Representational Image | (Photo Credits: Pixabay.com)

Thane: ठाणे येथे 25 वर्ष जुनी असलेल्या एका चार मजली इमारतीमधील एका घराचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 2 जणांचा मृत्यू झाला असून एक 10 वर्षीय मुलगी जखमी झाली आहे. ही घटना रविवारी पहाटे 6 वाजता घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. अशफाक वागणी यांच्या मालकिची असलेली खत्री इमारतीच्या सी-विंग मध्ये ही घटना घडली आहे. स्लॅब कोसळल्यानंतर त्याखाली 3 जण अडकले गेले होते. या इमारतीच्या दुसऱ्या विंग मध्ये राहणाऱ्या एक व्यक्ती ही दुर्घटना घडल्याने तेथे धावत आला. तेथे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि लोक आरडाओरड करत असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले.

महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अन्य काही जणांच्या मदतीने स्लॅब खाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करु लागले. यामध्ये दोन जणांना मृत्यू झाला असून रमिज शेख (32) आणि गोअस तंबोळी (38) अशी त्यांची नावे आहेत. तर फराह गोअस असे 10 वर्षीय मुलीचे नाव असून ती गंभीररित्या जखमी झाली असून तिला स्थानिकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने ए, बी आणि सी विंग मधील 73 खोल्यांमधील नागरिकांना दुसऱ्या ठिकाणी तात्पुरते हलविण्यात आले आहे. ठाण्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी या दुर्घटनास्थळी भेट दिली. या इमारतीमधील क्लस्टरचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. यासाठी महापालिकेकडून अशा धोकायदक इमारतींच्या सुधारासाठी मंजुरी देण्यात आली आहे. तसेच स्लॅब कोसळून दोन जणांचा मृत्यू झाल्या प्रकरणी शिंदे यांनी दु:ख व्यक्त केले.(Hingoli Earthquake: हिंगोली जिल्ह्यात औंढा, कळमनुरी तालुक्यात 3.3 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के)

मृतांच्या परिवाराला सरकारच्या नियमानुसार आर्थिक मदत दिली जाईल असे ही शिंदे यांनी स्षष्ट केले आहे. तर निवडून आलेल्या प्रतिनिधींसह, नागरी महामंडळासह या संबंधित लोकांनी दुरुस्तीचे काम पूर्ण करावे असे ही एकनाथ शिंदे यांनी सुचना दिल्या आहेत. नागरी महामंडळाने असे म्हटले की, संपूर्ण इमारातीच्या तिन्ही विंग्स आणि 73 खोल्या सील करण्यात आल्या असून त्याचे ऑडिट केले जाईल. तर या इमारतीचे इन्स्पेक्शन 2013 मध्ये करण्यात आले होते आणि ती इमारत धोकादायक असून त्यांना नोटिस सुद्धा धाडण्यात आली होती.