Thane: शहापूरमध्ये बर्ड फ्लूचे थैमान, तीनशेहून अधिक कोंबड्यांचा मृत्यू
Bird Flu Outbreak (Photo Credits: Pixabay)

कोरोनाच्या वाढता संसर्ग राज्यात कमी झाला असताच, नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार शहापूर (Shahapur) तालुक्यातील वेहलोली गेल्या काही दिवसांत तीनशेहून (More than 300 Hen died) अधिक कोंबड्यांना बर्ड फ्लूची (Bird Flu) लागण झाली आहे. त्यांमुळे अनेक कोंबड्या तडफडुन मेल्या आहेत. पशुसंवर्धन विभागाला माहिती (Department of Animal Husbandry) मिळताच त्यांनी तात्काळ कोबड्यांची तपासणी केली. तपासणीत कोंबड्या बर्ड फ्ल्यूने मेल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यानंतर जवळच्या परिसरात बाधीत झालेल्या कोंबड्या नष्ठ करण्याचं काम सूरू आहे. तसेच परिसरातील चिकन विक्रेत्यांची दुकाने तिथली वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश ठाणे जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणा-या मॅसेजवरती कोणीही विश्वास ठेऊ नका असं आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून देण्यात आले आहे.

Tweet

शहापूर येथील मुक्तजीवन सोसायटीच्या शेडमध्ये सर्व कोंबड्यांची कत्तल करण्यात आली असून शेडमध्ये किमान 100 कोंबड्या आणि काही बदके सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाने बाधित क्षेत्रापासून एक किमीच्या परिघात असलेल्या पोल्ट्री फार्ममधील पक्षी तसेच चारा आणि अंडी नष्ट करण्यासाठी वैज्ञानिक मोहीम राबवली आहे. बाधित क्षेत्र संसर्गमुक्त होईपर्यंत बाधित क्षेत्राच्या एक किलोमीटर परिघात चिकन विक्रेते आणि वाहतूकदारांचे दैनंदिन व्यवहार बंद करण्याचे आदेशही ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. (हे ही वाचा Murder: डोंबिवलीत 33 वर्षीय महिलेची हत्या, मृतदेह पलंगामध्ये लपवून आरोपीचे पलायन, शोध सुरू)

वेहळोली येथे कोंबड्या मृत्यू पडल्या होत्या. त्या कोंबड्यांचे रक्ताचे नमुने पुणे येथील तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात ते बर्ड फ्लू असल्याचे समोर आले. परिसराव्यतिरिक्त इतर कुठेही अशी बाब निदर्शनास आली नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. या सर्व परिस्थितीवर जिल्हा प्रशासन लक्ष ठेवून आहे.