एका 13 वर्षाच्या (Minor Girl) मुलीचा विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी न्यायालयाने 40 वर्षीय व्यक्तीला 3 वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना गेल्या काही महिन्यापूर्वी ठाणे परिसरात घडली होती. दरम्यान, आरोपीने पीडित मुलीच्या मागे शौचालयात जावून तिचा विनयभंंग केला होता. तसेच या घटनेची माहिती कोणालाही कळवली पालकांना इजा पोहचवेल, अशी धमकीही आरोपीने पीडितेला दिली होती. परंतु पालकांनी अधिक विचारणा केल्यानंतर ही बाब उघड झाली होती. याआधीही आरोपीने पीडित मुलीचा पाठलाग केला होता. यामुळे पीडिताच्या पालकांनी त्याला फटकारून काढले होते.
कलामुद्दीन मोहम्मद नासिर खान असे आरोपीचे नाव आहे. खान नवी मुंबईच्या दिघा गावात किराणा दुकान चालवतो. आरोपी आणि पीडित एकाच भागातील रहिवासी आहेत. खान याने अनेकदा पीडित मुलीचा पाठलाग केला होता. परंतु, 23 जून रोजी पीडित मुलगी सार्वजनिक शौचालयात गेली असताना रडत बाहेर आली होती. त्यावेळी पालकांनी मुलीची अधिक विचारणा केल्यानंतर ही धक्कादायक माहिती समोर आली होती. त्याचबरोबर यासंदर्भात कोणालाही माहिती दिली तर, तुझ्या पालकांना मोठी इजा करेल, अशी धमकी खान याने पिडीत तरुणाला दिली होती. याआधीही पीडिताचा पाठलाग केल्याप्रकरणी तिच्या पालकांनी खानला चोप दिला होता. हे देखील वाचा-मुंबई: धावत्या बसमध्ये एका महिलेसोबत अश्लील कृत्य करणाऱ्या तरुणाला अटक
या प्रकरणी पोस्को कोर्टाचे विशेष न्यायाधीश आर.सी. व्ही. ताम्हाणेकर आपल्या आदेशात म्हणाले की, या प्रकरणांमध्ये वेळ लागल्यास समाजात चुकीचा प्रभाव पडेल. यासाठी लवकरात आरोपीला शिक्षा व्हावी, असे आम्ही प्रयत्न करत आहोत. दरम्यान, आरोपी खानला सहा हजार रुपये दंड ठोठावून ३ वर्षांची कठोर कारावासाची शिक्षा केली आहे.