
मुंबईत (Mumbai) धावत्या बसमध्ये महिलेचा विनयभंग (molestation) केल्याची लाजीरवाणी घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका 22 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. ही घटना चेंबूर (Chembur) भागातील लालडोंगर येथे शुक्रवारी घडली. पॅंटची चैन उघडून अंगाला स्पर्श केल्याची तक्रार संबधित महिलेने पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. पोलिसांनी आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा नोंदवून त्याला न्यायालयात हजर केले. याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे.
राजेंद्र पाटील असे या आरोपीचे नाव आहे. राजेंद्र हा चेंबूर येथील लालडोंगरचा रहवासी आहे. शुक्रवारी बेस्ट बसमधून प्रवास करताना राजेंद्र याने विनयभंग केला आहे, अशी तक्रार संबधित महिलेने नोंदवली आहे. प्रवास दरम्यान बस मध्ये गर्दी असल्यामुळे संबधित महिला एका बाजूला उभी होती. त्यावेळी राजेंद्र हा या महिलेच्या मागे उभा राहून धक्का देत होता. बसमध्ये खूप गर्दी असल्यामुळे राजेंद्रचा धक्का लागत असेल, असे महिलेला सुरुवातीला वाटत होते. यामुळे या महिलेने राजेंद्रकडे दुर्लक्ष केले. परंतु, काही वेळाने अनेक प्रवासी उतरू लागले, तरीदेखील राजेंद्र या महिलेच्या मागेच उभा होता. काहीवेळाने राजेंद्र हा मुद्दाम हे कृत्य करत असल्याचे महिलेला कळाले. यासाठी महिलेने पाठी वळून पाहिले तर, त्यावेळी राजेंद्रच्या पॅंटची चैन उघडीच होती. महिलेने हा प्रकार इतर प्रवाशांना सांगितला, त्यांनी संबधित महिलेची मदत करत राजेंद्र याला पोलिसांच्या स्वाधीन केले. हे देखील वाचा- शिवसेना वाहतूक सेनाचे अध्यक्ष दीपक महेश्वरी यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल, एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बसमधील गर्दी असल्यामुळे आरोपीचे धक्के लागत आहेत, असे संबधित महिलेला वाटत होते. परंतु, काहीवेळाने आरोपी हा अश्लील कृत्य करत असल्याचे महिलेला जाणवू लागले. त्यावेळी महिलेने पाठी पाहिले तर, आरोपीने चक्क त्याच्या पॅंटची चै उघडल्याचे समोर आले. त्यानंतर महिलेने आरोपीच्या कानशिळात लगावून या कृत्याबदल बसमधील इतर लोकांना याची माहिती दिली. बसमधील प्रवाशांनी त्याला पकडून पोलिसाच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलिसांनी राजेंद्रवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या प्रकरणी राजेंद्रला पोलीस कोठडी सुनावली आहे.