राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी राजभवनात संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Chief Minister of Maharashtra) असतील अशी घोषणा केली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या कामावर निशाना साधला तसेच त्यांच्यावर टीका सुद्धा केली आहे. फडणवीस म्हणाले की, औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्याच्या नामांतराच्यासह बुधवारी मंत्रीमंडळात झालेले निर्णय कायदेशीर वैध नसल्याचं फडणवीस यांनी म्हंटले आहे. राज्यपालांनी बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर मंत्रिमंडळाची बैठक घेता येत नसल्याच फडणवीस म्हणाले.
ठाकरें सरकारचा निर्णय बेकायदेशीर
बुधवारी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याआधी उद्धव ठाकरे यांनी मंत्रीमंडळाची बैठक बोलावली होती. यावेळी औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. यासोबत आणखी आठ प्रस्तावाला सुद्धा मान्यता देण्यात आली आहे. मात्र या बैठकीत घेण्यात आलेले निर्णय बेकायदेशीर असल्याचं फडणवीस म्हणाले आहे. जेव्हा राज्यपाल बहुमत चाचणी घेण्याचे निर्देश देतात तेव्हा बहुमत सिद्ध झाल्याशिवाय मंत्रीमंडळाची बैठक घेता येत नसल्याच फडणवीस म्हणाले. त्यामुळे ते निर्णय आम्ही पुन्हा घेऊ असे फडणवीस म्हणाले. (हे देखील वाचा: Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदासाठी नाव जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, फडणवीसांचे कौतुक आणि उद्धव यांच्यावर साधला निशाणा)
आज फक्त एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी होणार
फडणवीस म्हणाले की, आज फक्त एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातून मी बाहेर राहणार आहे. ते म्हणाले की 2019 मध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढले. त्यावेळी आम्हाला पूर्ण बहुमत मिळाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला मोठा विजय मिळाला. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडा, असे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना सांगत होते, पण उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचे ऐकले नाही.