मुंबई मध्ये GoFirst, Star Air, AirAsia India आणि TruJet या चार एअरलाईन्स डोमेस्टिक फ्लाईट्स विलेपार्ले टर्मिनल टी 1 वरून आता सुरू होणार आहे. ही सेवा 20 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून सुरू होणार आहे. याबाबत Mumbai International Airport Ltd (MIAL)कडून माहिती देण्यात आली आहे.
IndiGo च्या काही ठराविक फ्लाईट्स 31 ऑक्टोबर पासून सुरू होत आहे. सध्या अनेक फ्लाईट्स या मुंबई विमानतळावर टी 2 वरून सुरू आहेत. टी 1 पार्ले वरून अंदाजे 156 फ्लाईट्स चालवली जाणार आहेत. तर टी 2 वरून 396 फ्लाईट्स ची सेवा सुरू राहणार आहे. टी 1 वर लाऊंज, फूड आणि शीतपेयांची आऊटलेट्स आहेत. अरायवल आणि डिपारचर वर आरटीपीसीआर टेस्ट सेंटर्स आहेत. आऊट ऑफ मुंबई इंडोगोची फ्लाईट्स नोव्हेंबर महिन्यापासून शेड्युल केली जाणार आहेत. त्यांना फ्लाईट्स वर टर्मिनल पाहता येणार आहेत.
भारतामध्ये सध्या कोविड 19 लसीकरण मोठया प्रमाणात सुरू त्यामुळे प्रवाशांना आता विमानप्रवासाचा आत्मविश्वास आला आहे. कोविड 19 च्या दुसर्या लाटेनंतर विमानप्रवासावरील त्याचा प्रभाव पाहता अवघ्या महिन्याभरातच ते बंद करण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा टी 2 वर वाहतूक वळवावी लागली होती. Mumbai Airport वर गरब्याचा Flash Mob आणि नंतर AAHL चं मुख्यालय गुजरात ला हलवल्यानंतर MNS, महाराष्ट्र कॉंग्रेस कडून टीकास्त्र .
सध्या मुंबई मध्ये CSMIA च्या व्यवस्थापनाची जबाबदारी जुलै महिन्यापासून GVK Group कडून आता Adani Airports Holding Ltd कडे देण्यात आली आहे.