Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Teacher Suicide: महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात एका शिक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परभणी जिल्ह्यातील जिंतून शहरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षकाने आत्महत्या का केली हे अद्याप समोर आले नाही. ही घटना शनिवारी 18 फेब्रुवारी रोजी दुपारच्या वेळीस घडली. (हेही वाचा- अंबरनाथमध्ये तरुणांची लाठ्या काठ्या मारून हत्या, परिसरात खळबळ)

मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूर शहरातील संभाजीनगर भागात ही घटना घडली आहे. राहुल उबाळे (वय वर्ष 36) असं आत्महत्या करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे. राहुल याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. राहुल यांनी आत्महत्या केल्याचे समोर आल्यानंतर गावात खळबळ उडाली.  आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट झाले आहे.  राहुल उबाळे हे गटशिक्षणाधिकारी कार्यलयात कार्यरत होते. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलवरून आपल्या भावाला माहिती दिली होती.  शेजाऱ्यांनी घरात पाहणी केली असता तेव्हा राहुल यांनी गळफास घेतल्याची अवस्थेत दिसले. यावेळी शेजारच्यांनी या घटनेची माहिती नातेवाईकांना दिली.

नातेवाईकांनी या घटनेची माहिती देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांना राहुल उबाळे यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी त्यांना तपासून राहुल यांना मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. पोलिसांनी राहुल यांच्या घरी तपासणी केली. परंतु पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. गावात पोलिस चौकशी सुरु आहे.