Ambernath Crime News: अंबरनाथमध्ये तरुणांची लाठ्या काठ्या मारून हत्या, परिसरात खळबळ
या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच उल्हासनगर क्राईम ब्रँच करीत आहे.
काही दिवसापुर्वीच अंबरनाथच्या एका जमिनीवरुन उल्हासनगरमधील पोलीस स्थानकात गोळीबाराची घटना घडल्यानंतर अंबरनाथमध्ये (Ambernath) खळबळ माजली होती. यानंतर अंबरनाथमध्ये (Ambernath Crime) शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोघांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अंबरनाथमधील दुर्गापाडा परिसरात ही घटना घडली. अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या (Shivaji Nagar Police Staion) हद्दीत ही घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. (हेही वाचा - Maharashtra: चिपळूणमध्ये माजी खासदार निलेश राणे यांच्या ताफ्यावर दगडफेक, कठोर कारवाईचे आदेश)
शनिवारी दुपारी दुहेरी हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. सूरज परमार आणि सूरज कोरी या दोन तरुणांची हत्या झाली. या दोन तरुणांची लाठ्या काठ्या मारून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. या हत्येने दुर्गापाडा परिसरात खळबळ उडाली आहे. अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुर्गापाडा परिसरात रात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांड झाल्याची घटना समोर आली आहे.
दरम्यान, मृत झालेल्या दोन्ही व्यक्ती भुरटे असल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यावर पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या दोन तरुणांची हत्या का झाली? कशी झाली? का करण्यात आली? याबाबत विविध अंदाज पोलिसांकडून लावले जात आहेत. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दहा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा तपास शिवाजीनगर पोलीस ठाणे तसेच उल्हासनगर क्राईम ब्रँच करीत आहे.
(The above story first appeared on LatestLY on Feb 17, 2024 05:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

