Tatyarao Lahane, Devendra Fadnavis (Photo Credit: Facebbok)

पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने (Tatyarao Lahane) यांच्या सत्कारासाठी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) अहमदनगर (Ahmednagar) येथे आले होते. यावेळी झालेल्या भाषणादरम्यान तात्याराव लहाने यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्यामुळेच मी आज शासनाच्या सेवेत काम करू शकलो. परंतु, मागील सरकारच्या वेळी मला खूप त्रास झाला. मला पद्मश्री मिळाला तरी मला खूप त्रास झाला', असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला आहे. तात्याराव यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ माजली आहे.

नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात वंजारवाडी येथील संत वामनभाऊ- संत भगवानबाबा प्रतिष्ठान यांच्यावतीने संत भगवानबाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात तात्याराव यांना सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी तात्याराव म्हणाले की, सरकारी नोकरीत असताना मला चांगल्या कामाबद्दल पद्मश्री पुरकास्कार मिळाला होता. तरीही मागील सरकारच्या काळात मला प्रचंड त्रास झाला. मात्र, त्यावेळी मला धनंजय मुंडे यांचा मोठा आधार मिळाला. ज्यामुळे मी सरकारी नोकरीत राहू शकलो. तसेच माझ्या आयुष्यात कमवलेले सर्व पुण्य धनंजय मुंडे यांच्या वाटेला जावे, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Indurikar Maharaj On Dhananjay Munde: इंदुरीकर महाराज म्हणतात 'धनंजय मुंडे यांना संत वामनभाऊ, भगवानबाबा यांचा आशीर्वाद प्राप्त'

दरम्यान डॉ.लहाने यांची ख्याती महाराष्ट्रात बिनटाक्याचे डोळ्याचे ऑपरेशन करणारे अशी आहे. केवळ सामाजिक बांधिलकी म्हणून त्यांनी महाराष्ट्रात गावोगावी जाऊन मोफत नेत्र शिबिरं भरवली आहेत. तसेच अनेकांवर शस्त्रक्रिया केल्या आहेत. सध्या ते कोरोना संकट काळातही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. 2008 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरवण्यात आले आहे.