Tata Mumbai Marathon 2019: मॅरेथॉन दरम्यान मुंबईतील हे मुख्य रस्ते राहतील बंद
Representational Image (Photo Credits: PTI)

Tata Mumbai Marathon 2019: आज मुंबईत सकाळपासूनच मॅरेथॉनचा उत्साह दिसत आहे. टाटा कडून आयोजित करण्यात आलेली ही 16 वी मॅरेथॉन स्पर्धा असून यात सुमारे 50 हजार लोक सहभागी होणार आहेत. सहभागी होणाऱ्या लोकांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीच्या मार्गात काही बदल करण्यात आले आहेत. वाहतुकीमुळे निर्माण होणारा धोका, असुविधा आणि अडथळा टाळण्यासाठी काही मार्गावर वाहतुकीचे नियमन करण्यात आले आहे. आज पहाटे 5:30 पासून या स्पर्धेला सुरुवात झाली.

अॅम्बुलन्स, फायर ब्रिगेट, दूध गॅस, पालेभाज्या इत्यादी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना सदर मार्गांवरुन वाहतुक करण्यास मुभा देण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी वाहतुकीत केलेले बदल

मरीन ड्राईव्ह पासून बांद्रा वरळी सी लिंक दरम्यान असलेले लहान मोठे रस्ते सकाळी 4 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बंद राहतील. मुंबई मॅरेथॉनसाठी वाहतुकीच्या मार्गात बदल; विशेष लोकल्स, बसेसची सुविधा

तुलसी पाईप रोड, दादर, महालक्ष्मी, मुंबई सेंट्रल, सात रस्ता, जे. जे. फ्लाईओव्हर, ऑगस्ट क्रांती मैदान यांसारखे मुख्य रस्ते बंद करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे मुंबईच्या दिशेने प्रवास करणारे लोक या मार्गांचा अवलंब करु शकतात.

हे मुख्य रस्ते बंद असतील

एमजी रोड, केबी पाटील मार्ग, वीर नरिमन रोड, ए. एस. D’mello मार्ग, एन एस रोड , कूपरेज रोड, गोपाल राव देशमुख मार्ग, भुला भाई देसाई रोड, ताडदेव रोड, एनी बेसेंट रोड, बांद्रा वरली सी लिंक इत्यादी रस्ते बंद करण्यात आले आहेत.

तसंच आवश्यक नसल्यास खाजगी वाहनांचा वापर टाळावा. शक्यतो प्रवासासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन मुंबई पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

हाफ मॅरेथॉन वरळी दूध डेरीपासून सुरु होईल. यासाठी विशेष बसेसची सुविधा देण्यात आली आहे.