Talathi Bharti 2023 Maharashtra Last Date: महाराष्ट्र राज्य महसूल व वन विभाग द्वारा रिक्त असलेल्या 4644 तलाठी पदांसाठी भरती निघाली आहे. सरकारी नोकरी मिळावी अशी आस असलेल्या तरुण-तरुणींसाठी ही सूवर्ण संधी आहे. मात्र, ही संधी आता पुढचे काहीच तास उपलब्ध असणार आहे. कारण, तलाठी भरती अर्ज भरण्याची आज (25) शेवटची मुदत आहे. वास्तविक पाहता 26 जून 2023 पासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. जी आज संपत आहे. त्यामुळे आपण जर अर्ज भरला नसेल तर तातडीने भरा. अर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे, वयाची अट, पात्रता याबाबत माहिती खाली दिलेली आहे.
तलाठी पदासाठी एकूण 4644 जागांसाठी ही भरती निघाली आहे. महसूली प्रशासन विभागात हे पद 'क' वर्गात मोडते. या पदासाठी मासिक वेतन 25,500 ते 81,100 इतके असते. अर्थात वेतनाच्या आकड्यात सरकारी नियम, अटी, शर्थी व तत्कालीन स्थिती यांनुसार बदल होऊ शकतो. पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे 17 जुलै 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण आणि 38 वर्षांपेक्षा कमी असावे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी वयामध्ये 05 वर्षांची सूट आहे. नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे. (हेही वाचा, Maharashtra Forest Department Recruitment 2023: महाराष्ट्र वन विभाग भरती; जाणून घ्या पदे, जागा आणि अर्ज करण्याची मुदत)
अर्ज भरण्यासाठी खालील ट्विटमधील लिंकवर क्लिक करा
तलाठी भरती वेबसाईट सुरळीत चालू आहे. ज्यांनी अजून फॉर्म भरले नाहीत त्यांनी भरून घ्या..
☞ लिंक:https://t.co/tjp4b0IJI3
☞ आज शेवटची तारीख: 25 जुलै 2023#तलाठी #भरती #पुणे #pune #Maharashtra #TalathiBharati2023 #एमपीएससी #mpsc #upsc #मराठी #म #महाराष्ट्र @TalathiBharati
— 𝐌𝐚𝐝𝐡𝐚𝐯 𝐒𝐚𝐰𝐚𝐥𝐞 𝐏𝐡𝐃 🇮🇳🐘 (@madhavsawale) July 25, 2023
तलाठी पदासाठी अर्ज करणारा अर्जदार खुल्या प्रवर्गातून येत असेल तर त्यासाठी त्याला अर्जाचे शुल्क 1000 रू व मागासवर्गीय असेल तर 900 रुपये असेल. आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे: 1) आधार कार्ड (Aadhar card) 2) जातीचा दाखला (Caste certificate) 3) फोटो,सही, 4) ईमेल आयडी, मोबाईल नंबर, 5) संबंधित पदवीचे मार्कशीट, 6) 10 वी 12 वी मार्कशीट, 7) डाव्या हाताचा अंगठा ठसा, अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 जुलै 2023 मुदतवाढ 18 जुलै 2023 पुन्हा मुदतवाढ 22 जुलै ते 25 जुळी 2023 रात्री 12 वाजेपर्यंत. याचाच अर्थ असा की, आज रात्री बारा वाजता या भरतीसाठी असलेली मुदत अधिकृतरित्या बंद होईल.