Government Jobs 2023 | (File Photo)

Maharashtra Talathi Bharti 2023: महाराष्ट्र सरकारच्या महसूल आणि वन विभागाने रिक्ता जागा भरण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या तलाठी (गट-क) संवर्गासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. साधारण 4344 पदांसाठी ही भरती राबविण्यात येणार आहे. राज्यातील एकूण 36 जिल्ह्यांमध्ये विविध केंद्रांच्या माध्यमातून या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा (Computer Based Test) घेण्यात येईल. ही परिक्षा जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्या वतीने घेतली जाईल.

उमेदवारांना भरती संदर्भात अधिक माहिती http://mahabhumi.gov.in वर मिळू शकते. या वेळी तलाठी भरतीसाठी विविध निकषांवर आधारीत आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यात खेळाडू, दिव्यांग, अनाथ, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी आदींचाही समावेश आहे.

परिक्षा प्रक्रिया: तलाठी पदासाठी होणारी भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने घेता येईल. ही परीक्षा एकूण 200 गुणांची असेल. ज्यात मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी/ अंकगणित या विषयांसाठी प्रत्येकी ५० गुण असतील. प्रत्येकी दोन गुण अशा स्वरुपात प्रत्येक विषयाच्या विभागात 25 प्रश्नांचा समावेश असेल. परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या पदवी परीक्षेच्या समकक्ष असेल. मात्र, मराठी आणि इंग्रजी विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (बारावी) यांच्याशी समान असेल. निवडप्रक्रीयेत पात्र ठरण्यासाठी उमेदवाराला किमान 45% गुण मिळविणे आवश्यक आहे.

पात्रता: उमेदवार भारतीय नागरिक असावा. तो खुल्या प्रवर्गातील असेल तर त्याचे वय 18 पेक्षा कमी आणि 38 वर्षांपेक्षा अधिक नसावे. उमेदवार मागासवर्गीय असेल तर तो 18 वर्षांपेक्षा कमी आणि 43 वर्षांपेक्षा अधिक वयाचा नसावा. पदवीधारक आणि अंशकालीन उमेदवारांसाठी वयोमोर्यादा कमाल 55 इतकी असेल. स्वातंत्र्य सैनिक पाल्य आणि सन 1991 च्या जगगणा कर्मचारी व 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी यांच्यासाठी ही अट 45 वर्षांची असेल. उमेदवार दिव्यांगअसेल तर वयोमर्यादा सरसकट 45 वर्षे इतकी असेल तसेच त्या उमेदवारास ४० टक्के दिव्यांगत्व असल्यास आणि प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील. दरम्यान, भूकंपग्रस्तांसाठीही कमाल वयोमर्यादा 45 वर्षेच राहील.

कागदपत्रे: उमेदवाराने अर्ज दाखल करताना केलेले दाव्यांच्या पुष्ठ्यार्थ संबंधित कागदपत्रे पीडीएफ स्वरुपात अपलोड करावीत. अर्जातील नावाची ओळख पटविण्यासाठी उमेदवारांनी इयत्ता 10 वी 12वी (एसएससी किंवा तस्यम) गुणपत्रिका सादर करावी. आवश्यकतेनुसार इतर कागदपत्रेही जमा करावीत. जसे की, दुर्बल घटक असल्याचा पुरावा,नॉन क्रिमिलेअर (NCL) , पात्र दिव्यांग व्यक्ती/माजी सैनिक/खेलाडू/अनाथ/प्रकल्प अथवा भूकंपग्रस्त/ अंशकालीन पदवीधर/ नावात बादल झाला असल्याचा पुरावा आदी संदर्भात आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. उमेदवारांचा अर्ज हा शासनाच्या विहित संकेतस्थळावरच स्वीकारला जाईल.