Image For Representation (Photo Credits-Facebook)

मुंबईत (Mumbai) सध्या रस्ता अपघाताचे प्रमाण वाढले असून यावर आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून (RTO) युद्धपातळीवर प्रयत्न केले जात असतात. यातच रस्ता अपघातावर नियंत्रण मिळणव्यासाठी मुबंईतील प्रादेशिक परिवहन विभागाने नव्या नियमांना प्राधान्य दिले आहे. संबधित वाहनचालकाने एका वर्षात वाहन चालवत असताना सिग्नल तोडले (Jumping Red Light), फोनवर बोलले (Talking On Phone) किंवा भरगाव वेगाने वाहन चालवले (Speeding) तर, त्याचे ड्राईव्हिंग लायसेन्स (Driving Licences) 3 महिन्यासाठी रद्द केले जाणार, अशी माहिती मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाने दिली आहे.

मुंबईच्या रस्त्यावर दररोज अपघात घडत असतात. परंतु, सर्वाधिक अपघात हे सिग्नल तोडल्यामुळे, फोनवर बोलण्यामुळे किंवा भरगाव वेगाने वाहन चालवल्यामुळे होतात, अशी माहिती समोर आली आहे. परंतु, अशा वाहनचालकांना धडा शिकवण्यासाठी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाने नव्या नियमांना प्राधान्य दिले आहे. तसेच या नव्या नियमांमुळे रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण कमी होतील, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संबधिक वाहनचालक वरील नियमांचे एका वर्षात तीन पेक्षा अधिकवेळा उल्लंघन करेल तर, त्याचे 3 महिन्यांसाठी ड्राईव्हिंग लायसेन्स रद्द केले जाईल, असे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. हे देखील वाचा- Driving Licence Renewal नियमांमध्ये झाला हा मोठा बदल; असे नाही केले तर पुन्हा द्यावी लागेल लर्निंग टेस्ट

प्रादेशिक परिवाहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसात 92 टक्के वाहनचालक सिग्नल तोडत असतात. याच टक्क्याच्या बरोबरीत भरभाव वेगाने वाहन चालवले जातात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये दुचाकीच्या तुलनेत मोटार वाहनचालक अधिक आढळतात.