Cartoon (Photo Credit: Twitter)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप- शिवसेना (BJP-Shivsena) यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन मोठा वाद सुरु झाला आहे. दरम्यान, दोन्ही पक्षातील नेते एममेकांवर शाब्दीक हल्ला करु लागले आहेत. शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही दिवसापूर्वी ट्विटरवर एक व्यंगचित्र पोस्ट करुन भाजपवर निशाणा साधला होता. यावर भाजपचे प्रवक्ता तेजिंदर पाल सिंह बग्गा (Tajinder Pal Singh Bagga) यांनी शिवसेनेवर पलटवार केला आहे. बग्गा यांनीही ट्विटरच्या माध्यमातून एक व्यंगचित्र शेअर करत शिवसेना पक्षाची खिल्ली उडवली असल्याचे दिसत आहे.

बग्गा यांनी शेअर केलेल्या व्यंगचित्रात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखी दिसणारी व्यक्तीरेखा त्यांच्या हातात रिंग घेऊन ऊभे आहेत. तसेच या व्यंगचित्रावर आखिर तुम्हे आना है...जरा देर लगेगी, असे वाक्य लिहले गेले आहे. यात देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षाचे प्रतिक समजले जाणाऱ्या वाघाला रिंगमधून उडी मारण्याचा इशारा करीत आहे. संजय राऊत यांच्या टिकेवर भाजपच्या नेत्यानी हा पलटवार आहे. यावर शिवसेना पक्षाची अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. हे देखील वाचा- मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, ठरवलं तर शिवसेना बहुमत सिद्ध करु शकते: संजय राऊत

तेजिंदर पाल सिंह बग्गा ट्विट-

 

याआधी संजय राऊत यांनी काही दिवसापूर्वी ट्विटरच्या माध्यमातून एक व्यंगचित्र शेअर केले होते. त्यात एआका वाघाच्या हातात कमळाचे फूल असल्याचे दिसले आणि गळ्यात घड्याळ दिसले. जे राष्ट्रवादी पक्षाचे पक्षचिन्ह आहे. त्यावेळी संजय राऊत म्हणाले होते की, यावेळी शिवसेना पक्षाचाच मुख्यमंत्री होणार. तसेच भाजप-शिवसेना यांच्यातील वाद कमी होतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संजय राऊत यांचे ट्वीट-

दरम्यान, भाजपने सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु केल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता, राऊत म्हणाले जर त्यांच्याकडे 145 हा बहुमताचा आकडा असेल तर त्यांनी लगेच सरकार स्थापन करावे. जर, त्यांच्याकडे बहुमताचा आकडा आहे तर, ते सरकार का स्थापन करत नाहीत, हे महाराष्ट्रालाच नव्हे तर, देशाला कोडे पडले आहे, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.