फोटो सौजन्य- ANI
ऐन दिवळीत ऑनलाईन खरेदीवर भरघोस सूट दिली जाते. त्यामुळे दहिसरमध्ये राहणाऱ्या एका मुलाने ऑनलाईन पद्धतीने टी शर्टची खरेदी केली असता त्याला लखोंचा गंडा घातला गेल्याची घटना घडली आहे.
सीमा वाघेला यांच्या मुलाने दिवाळीनिमित्त त्यांच्या मोबाईलवरुन क्लब फॅक्टरी या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरुन एक टी शर्ट खरेदी केला. मात्र त्यांच्या मुलाला तो झाला नसल्याने त्याने पैसे परत करण्यासाठी सांगितले. तसेच पैसे परत मिळण्यासाठी पंधरा दिवस लागतील असे सांगून त्वरीत पैसे हवे असल्यास डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती द्या असे सांगितले. त्यांनंतर दुपारी ४.३० वाजता त्यांच्या बँक खात्यातून चक्क लाखो रुपयांची कॅश काही मिनिटांच काढल्याचा मॅसेज सीमा वाघेला यांच्या मोबाईलवर आला. त्यामुळे या घटनेने एवढी रक्कम काढली गेल्याने धक्का बसला.
या घटनेची तक्रार सीमा यांनी दहिसर पोलिसात केली आहे. तर अद्याप कोणालाही अटक करण्यात आले नसून पोलीस आरोपींचा शोध घेत असल्याचे सांगितले आहे.