Sushant Singh Rajput Death Case: सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्येचे प्रकरण CBI कडे देणे बेकायदेशीर-शिवसेना खासदार संजय राऊत
Sanjay Raut Speaks About Sushant Singh Rajput Suicide (Photo Credits: File Image)

अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याच्या आत्महत्येप्रकरणी दररोज नवे खुलासे होताना दिसून येत आहेत. मुंबई आणि बिहार पोलीस यांच्यामध्ये सुद्धा या प्रकरणावरुन काहीसा तणाव निर्माण झाला आहे. परंतु सुशांत याच्या आत्महत्येचे प्रकरण सीबीआयकडे (CBI) देणे हे बेकायदेशीर असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून तपास केला जात आहे. पण यामध्ये अजून काही असल्यास सीबीआय तपास करु शकतात असे ही राऊत यांनी म्हटले आहे.

सुशांत सिंह प्रकरणावरुन संजय राऊत यांनी काल शरद पवारांची सुद्धा भेट घेतल्याचे समोर आले होते. त्याचसोबत मुंबई पोलिसांकडून सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी संपूर्ण तपास पूर्ण होत नाही तो पर्यंत शांत रहावे असे ही संजय राऊत यांनी म्हटले आहे. ऐवढच नव्हे तर राजकीय पक्ष आणि विरोधकांनी सुद्धा या प्रकरणी शांत बसावे. मला असे वाटते की, मुंबई पोलिसांचा तपास आता संपणार आहे. परंतु तांत्रिक रुपाने तपास करण्याकरिता हे प्रकरण आता सीबीआयकडे गेले असून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत ही पोहचल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (Sushant Singh Rajput Death Case: शरद पवार कायदेशीर चौकटीतल्या गोष्टींना विरोध करत नाहीत- संजय राऊत)

दुसऱ्या बाजूला सुशांत सिंह राजपूत याच्या वडीलांसदर्भातील वादग्रस्त विधानानंतर त्याचा चुलत भाऊ आणि भाजप आमदार कुमार सिंह यांनी संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस धाडली आहे. या नोटीस मध्ये असे म्हटले आहे की, संजय राऊत यांनी केलेल्या या विधानावर 48 तासात माफी मागवी. अन्यथा त्यांच्या विरोधात मानहानीची केस दाखल करण्यात येईल. यावर राऊत यांनी असे म्हटले आहे की, अशा पद्धतीच्या हजारो केस रोज माझ्या ऑफिसात येतात. मी तथ्याच्या आधारवर म्हटले आहे. मी काही माफी मागणार नाही.