सुशांत सिंह राजपूत आत्महत्या (Sushant Singh Rajput Suicide Case) प्रकरणात अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी मुंबई पोलिसांवर निशाणा साधला होता. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी अमृता फडणवीस यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. याला निमित्त ठरले आहे मुंबई शहरातील मुसळधार पाऊस (Heavy Rains In Mumbai) आणि या पावसात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) केलेली कामगिरी. मुंबई पोलिसांच्या कामाचे कौतुक करताना सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे की, ' तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच...तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱ्या सेवाभावास सॅल्यूट.'
सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना सॅल्यूट केला आहे. दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर पोस्टमध्ये मुंबई पोलिस वगळता इतर कोणाचाही उल्लेख केला नाही. मात्र, सुप्रिया सुळे यांनी अमृता फडणवीस यांनाच अप्रत्यक्ष टोला लगावल्याचे मानले जात आहे. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात अमृता फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटले होते की, 'सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले जात आहे. ते पाहता मला वाटते मुंबईने मानवता गमावली आहे. सर्वासामान्य आणि निर्दोषी, स्वाभीमानी व्यक्तिसाठी मुंबईतील जगणे आता अधिक सुरक्षीत नाही.' (हेही वाचा, मुंंबईने माणुसकी गमावली! सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन अमृता फडणवीस यांंचे ट्विट पहा)
आपली मुंबई सुरक्षित आहे ही @MumbaiPolice तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच...तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱ्या सेवाभावास सॅल्यूट...
Salute🙏🏻 pic.twitter.com/5LW0b0G9Gd
— Supriya Sule (@supriya_sule) August 6, 2020
अमृता फडणवीस यांच्या ट्विटनंतर त्याचे राजकीय पडसाद उमटले होते. अमृता फडणवीस यांचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही अशीही टीका झाली होती. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध नेत्यांनी अमृता फडणीस याच्यावर जोदार टीका केली होती. राज्य परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अॅड. अनिल परब यांनी तर महाराष्ट्र आणि मुंबईत असुरक्षीत वाटत असेल तर हे राज्य सोडून जावे, असा सल्लाही अमृता फडणवीस यांना दिला होता.
The manner in which #SushantSinghRajputDeathCase is being handled - I feel #Mumbai has lost humanity & is no more safe to live - for innocent, self respecting citizens #JusticeforSushantSingRajput #JusticeForDishaSalian
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) August 3, 2020
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी काही काळ थांबून मुंबई पोलिसांना सलाम करत अमृता फडणवीस यांना टोला लगावला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''आपली मुंबई सुरक्षित आहे. ही मुंबई पोलीस तुम्ही बजावत असलेल्या कर्तव्यामुळेच...तुमच्या या मानवी मूल्ये जपणाऱ्या सेवाभावास सॅल्यूट''. सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन शिवसेना-भाजप असा सामना रंगला असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्याचे दिसते.