मुंंबईने माणुसकी गमावली! सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावरुन अमृता फडणवीस यांंचे ट्विट पहा
Amruta Fadnavis (Photo Credits: YouTube)

बॉलिवूड अभिनेता सुशात सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput  Suicide)  मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाटण्याहून मुंबईत आलेल्या आयपीएस अधिकाऱ्याला रविवारी रात्री BMC ने क्वारंटाइन केलं. या विषयाला सोशल मीडियावर वेगवेगळे फाटे फ़ुटत आहेत. अशातच आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांंनी सुद्धा ट्विट करुन तपास प्रक्रियेतील संबधितांवर ताशेरे ओढले आहेत. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास ज्या प्रकारे सुरू आहे, त्यावरून मला असं वाटतं की मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष आणि स्वाभिमानी नागरिकांसाठी आता मुंबईत राहणं अजिबात सुरक्षित नाही”, असं ट्विट अमृता फडणवीस यांनी केलं आहे. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी #JusticeforSushantSingRajput आणि #JusticeForDishaSalian हे दोन हॅशटॅगही ट्विट केले आहे. (सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात कोणत्याही राजकीय पक्ष, नेत्याचा संबंधांचा पुरावा नाही: मुंबई पुलिस आयुक्त परमबीर सिंह )

अमृता फडणवीस यांंच्या या ट्विटला युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी या ट्विटला उत्तर देत तुम्हाला पोलिसांच्या सिक्युरिटीवर विश्वास नसेल तर सुविधा सोडुन द्या ना असे आवाहन केले आहे. तसेच खासदार प्रियंंका चतुर्वेदी यांनी सुद्धा उत्तर देत हे ट्विट लज्जास्पद असल्याचे सांगितले आहे, मुंबई पोलिसांची सुरक्षा वापरता, तुमची बेसुर गाणी ऐकण्यासाठी पोलिसांना प्रेक्षक बनवता. AXIS बॅंकेत पोलिसांचे अकाउंटस फिरवता आणि बिहार निवडणुका येताच मुंबई पोलिसांना नावं ठेवुन अपमान करताय हे लज्जास्पद आहे. असे प्रियंका यांनी म्हंंटले आहे.

अमृता फडणवीस ट्विट

दरम्यान, सुशांत सिंंह राजपुत मृत्यु प्रकरणात मुंबई पोलिस तपास करत असताना महाराष्ट्र सरकारशी किंवा या प्रकरणाशी संबंधित नसलेल्या कोणालाही त्यावर भाष्य करण्याची गरज नाही कारण मुंबई पोलिस स्वत: हून चौकशी करण्यास सक्षम आहेत अशा शब्दात खासदार संजय राऊत यांंनी प्रतिक्रिया दिली होती तर गृहमंत्री अनिल देशमुख यांंनी सुद्धा सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात योग्य दिशेने तपास सुरु आहे असे सांगितले होते.