सर्वोच्च न्यायालय 'महाआघाडी'च्या याचिकेवर उद्या 11.30 वाजता करणार सुनावणी
Court Hammer | (Photo Credits-File Photo)

राज्यातील परत घेतलेली राष्ट्रपती राजवट, भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली मुख्यमंत्री तर, राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ या सर्व नाट्यमय घडामोडींनी आजचा दिवस मोठा खळबळजनक ठरला. या घटनेंतर राज्याच्या राजकारणातील सुत्रे वेगाने हालली. दरम्यान, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला असा आरोप शिवेसना (Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) या तिन्ही पक्षांच्या महाआघाडीने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली. या याचिकेवर उद्या (रविवार) सकाळी 11.30 वाजता सुनावणी होणार आहे.

दरम्यान, शिवसेनेने या आधी न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, तेव्हा शिवसेना या एकाच पक्षाने याचिका दाखल केली होती. मात्र, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी मिळून प्रथमच एकत्रितपणे याचिका दाखल केली आहे. (हेही वाचा, अजित पवार यांच्यावर नेमकी काय कारवाई झाली? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपूर्ण पत्र; वाचा सविस्तर)

याचिकेमधील प्रमुख मुद्दे

राज्यपालांनी विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलवावे

अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव घ्यावा

अधिवेशनाच्या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रिकरण करावे

एएनआय ट्विट

दरम्यान, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात राज्यपालांना वरील मुद्द्यांना अनुसरुन आदेश द्यावेत अशी विनंतीही केली आहे. या याचिकेवर न्यायालय सुनावणी घेणार आहे. या याचिकेवर न्यायालय काय निर्णय देणार याबाबत मात्र उत्सुकता कायम आहे.