मराठा आरक्षणास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, येत्या 17 मार्च रोजी होणार पुढील सुनावणी
File image of Supreme Court (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षण याचिकाकर्ते आणि मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मराठा आरक्षणास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. येत्या 17 मार्चला या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, मराठा समाज आरक्षणास स्थगिती देण्यास नकार देत आता या प्रकरणात अंतिम सुनावणी येत्या 17 मार्च रोजी होईल. याचिकेमध्ये म्हटले होते की, इंदिरा सहानी प्रकरणात संविधान पीठाकडून देण्यात आलेल्या आरक्षणाच्या 50% कोठ्याचे उल्लंघन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र सरकारने शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला आगोदर मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आव्हान देण्यात आले होते. मात्र, ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली होती. त्यानंतर याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्या आली. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी बुधवारी झाली.