जीएसटी गुप्तवार्ता महासंचालनालयाने (GST Intelligence Director General) सुनील हायटेक इंजीनिअरिंग लिमिटेडचे (Sunil Hitech Engineering Limited) संचालक सुनील रत्नाकर गुट्टे (Sunil Ratnakar Gutte) यांना अटक केली आहे. सुनील गुट्टे (Sunil Gutte) हे साखर सम्राट, उद्योगपती रत्नाकर गुट्टे (Ratnakar Gutte) यांचे चिरंजीव आहेत. बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (Input tax credit) प्रकरणात गुट्टे यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणात गुट्टे यांच्यासोबतच आणखी कोणाला अटक करण्यात आली आहे का, याबाबत माहती मिळू शकली नाही.
प्राप्त माहितीनुसार, सुनील गुट्टे यांच्यावर बनावट आयटीसीचा म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिट (Input tax credit) वापर आणि इतरांना दिल्याचा आरोप आहे. वस्तू सेवा यांचा वास्तवात पुरवठा किंवा साठा न करता केवळ बनावट पावत्यांच्या आधारे तब्बल 520 कोटी रुपये आयटीसी प्राप्त केला असाही गुट्टे यांच्यावर आरोप आहे.
प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सुनील गुट्टे यांच्या सुनील हायटेक इंजिनिअर्स लिमिटेडने साधारणपणे तीन हजार कोटी रुपयांच्या पावत्या दिल्या. देवाण घेवाण केलेल्या या पावत्याही बनावट होत्या. ज्यात 520 कोटी रुपयांची आयटीसी समाविष्ट असलेली आढळते. (हेही वाचा, Mumbai: नातेवाईकांच्या घरात सोनाच्या दागिन्यांची चोरी करणे मॉडेलला पडले महागात, पोलिसांनी ठोकल्या बेड्या )
धक्कादायक असेकी या बनावट बिलांचे लाभार्थी देशभरात असल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे देशभरात पसरलेल्या आयटीसी कार्टेलमद्ये सुनील गुट्टे यांची हायटेक कंपनीही असल्याचे जीएसटी विभागाचे म्हणने आहे. याच प्रकरणात सुनील गुट्टे यांना अटक करण्यात आली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
दरम्यान, सुनील गुट्टे यांचे वडील रत्नाकर गुट्टे यांच्यावरही या आधी अनेकदा कारवाई झाली होती. शेतकऱ्यांच्या नावावर त्यांच्या परस्पर कर्ज उचलल्या प्रकरणी गुट्टे यांना तुरुंगातही जावे लागले होते.