Representational Image (Photo Credits: Facebook)

Mumbai: ओशिवरा पोलिसांकडून शुक्रवारी 26 वर्षीय एका महत्वाकांक्षी मॉडेलला अटक करण्यात आली आहे. कारण या मॉडेलने नातेवाईकांच्या घरातून सोन्याचे  दागिने चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी ही एका इन्शुरन्स ऑफिसात अॅडव्हडाटझर म्हणून काम करत होती. परंतु कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये आरोपीची नोकरी गेल्याने तिला मॉडेलिंग संदर्भातील कामे मिळण्यासाठी पैशांची चणचण जाणवू लागली होती. याच कारणास्तव तिने चोरी केल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

शितल नीरज घोलप असे आरोपीचे नाव आहे. ती जोगेश्वरी पश्चिम येथील क्रांती नगर येथे राहते. तर गणेश नगर मध्ये राहणाऱ्या सुनिता आगावणे यांनी तिच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.तर ओशिवरा पोलिसांनी असे म्हटले की, घोलप ही महत्वाकांक्षी मॉडेल आहे. तिला पैशांची गरज होती. मात्र काही दिवसांपूर्वी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी ती आगावणे यांच्या घरी आली होती. तर तिला माहिती होते की, आगावणे काही खासगी कामासाठी जाणार आहेत. कामासाठी घरातील मंडळी निघाली पण मुद्दामून घोलप हिने आपला मोबाईल फ्लॅटमध्ये ठेवला. मंडळी इमारतीखाली आली असता घोलप हिने तिचा मोबाईल घरीच राहिल्याचे म्हटले. त्यावर तिने घराची किल्ली घेऊन तेथे जाऊन दागिन्यांची चोरी केली.(अमरावती: 'तिला पेट्रोल टाकून जाळून टाकेल', हुल्लडबाज तरुणाकडून युवतीच्या भावाला धमकी)

आगावणे हिने पु्न्हा अशाच मार्गाचा वापर केला आणि दसऱ्याच्या दिवशी पुन्हा आणखी दागिने चोरी केले. मात्र यावेळी परिवाराला संशय आला की आणखी काही दागिने आपल्या घरातूनच चोरी झाले आहेत. त्यामुळे त्यांनी पोलीस स्थानकात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यावेळी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात कलम 380 अंतर्गत गुन्हा दाखल केला गेला.

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली. त्यानुसार अगावणे यांच्या घरी त्यांनी भेट देत त्यांची चौकशी केली असता घोलप हिने आपला गुन्हा दाखल केला. पोलिसांनी 2 लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. आरोपीला दंडाधिकारी कोर्टात हजर केल्यानंतर शनिवारी जामिन दिला गेला.