अमरावती (Amravati) येथून एका हुल्लडबाज तरुणाने युवतीच्या भावाला जीवघेणी धमकी ( Death Threat) दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. ती मला आवडते. तू लांब राहा. तू जर आमच्या दोघांच्या मध्ये आलास तर तिला पेट्रोल टाकून जाळून टाकेल, अशी धमकी या टवाळखोराने पीडित युवतीच्या भावाला दिली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय सुरेश रत्नपारखी (वय 25, रा. न्यू कॉलनी, दस्तूरनगर) असे संशयीत आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटकही (8 नोव्हेंबर) करण्यात आले आहे.
प्राप्त माहितुसार, संशयीत आरोपी अक्षय आणि पीडित युवती एकाच शाळेत शिक्षण घेतात. आरोपीने पीडित युवतीचे छेयाचित्र वापरुन फेसबुकवर एक बनावट अकाऊंट तयार केले आहे. तसेच, पीडितेच्या नावासमोर स्वत:चे नाव आणि अडनाव लावले. आरोपीने विविध माध्यमातून अश्लील फोटो आणि संदेश पाठवत पीडितेची बदनामी केली. आरोपीच्या या कृत्याबाबत पीडितेने कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर पीडितेचा भाऊ आरोपीला समजविण्यासठी गेला असता आरोपीने त्याला धमकी दिली. (हेही वाचा, Kolhapur: इचलकरंजी येथील भाजप नगरसेविका नेहा हुक्किरे यांचे पती विनायक हुक्किरे यांच्यावर प्राणघातक हल्ला)
दरम्यान, महिला, युवती आणि एकूणच स्त्रीयांबाबतच्या अन्यायाच्या घटना समाजात नव्यान नाहीत. गेली अनेक वर्षे या घटनांना आळा बसावा यासाठी सरकार आणि विविध पातळ्यांवरुन प्रयत्न केले जात आहेत. तरीही स्त्रयांवरील अत्याचार, एकतर्फी प्रेमातून होणारे हल्ले, हत्या, अॅसीड हल्ले यांनाही आळा घालण्यात पूर्णपणे यश आले नाही. त्यामुळे महिला सुरक्षा हा नेहमीच ऐरणीवर राहिलेला विषय आहे.