मध्य रेल्वे मार्गावर तांत्रिक आणि अन्य विविध कामांसाठी आज मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे ब्लॉक दरम्यान काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून लोकल ट्रेनचे आजचे वेळापत्रक बदलले असणार आहे. या ब्लॉकमुळे लोकल्याच्या काही फेऱ्या रद्द करण्यासोबत गाड्या उशिराने धावणार असल्याची सुचना सुद्धा प्रवाशांसाठी देण्यात आली आहे. तर पश्चिम रेल्वे मार्गावरील गाड्यांसाठी आज ब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
Bमुख्य मार्गिका/B माटुंगा-मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. सकाळी 10.59 ते दुपारी 3.45 पर्यंत माटुंगा येथून सुटणाऱ्या डाऊन स्लो लाईन वरील सर्व सेवा विद्या विहार, कांजूरमार्ग आणि नाहुर स्थानकावर थांबणार नाही आहे. या मार्गावरील सर्व प्रवाशांना वाया घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड स्थानकावरुन प्रवास करता येणार आहे.(Mumbai AC Local: ट्रान्स हार्बर येथील ठाणे ते पनवेल मार्गावर धावणार पहिली एसी लोकल)
B हार्बर लाईन/B पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान नेरुळ/बेलापूर-कोपरखैराणे मार्गावर सुद्धा ब्लॉक असणार आहे. सीएसएमटीसाठी पनवेल/बेलापूर सकाळी 11.06 वाजते ते दुपारी 4.01 वाजेपर्यंत सुटणार्या सर्व अप हार्बर लाईन सेवा आणि बेलापूर/ पनवेलसाठी सीएसएमटी सकाळी 10.03 ते दुपारी 3.16 वाजता सुटणाऱ्या सर्व लोकल डाऊन हार्बर लाईन मार्गावरील सेवा रद्द करण्यात आली आहे. ठाण्यासाठी सकाळी 10.12 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर मार्गावर सुटणाऱ्या सर्व गाड्या ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा आणि पनवेलसाठी सकाळी 11.14 ते दुपारी 3.20 वाजता ट्रान्स-हार्बर मार्गावरील सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.