Sunday Mega Block: मध्य रेल्वे, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्यापूर्वी जाणून घ्या वेळापत्रक
Image For Representation (Photo Credits-Facebook)

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विविध कामांसाठी आज ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही घराबाहेर पडण्याचा विचार करत असाल तत्पूर्वी रेल्वेचे आजचे वेळापत्रक पाहून बाहेर पडा. कारण मध्य रेल्वे मार्गावरील उपनगरीय खंडावर अनुरक्षण कार्यासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक मुलुंड-माटुंगा अप धीम्या मार्गावर सकाळी 11.30 वाजल्यापासून ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत असणार आहे. तसेच पनवेल-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत (नेरुळ/बेलापूर-खारकोपर) मार्गासह ब्लॉक असणार आहे.

सकाळी 10.58 वाजल्यापासून ते दुपारी 3.55 वाजेपर्यंत ठाणे स्थानकातून सुटणारी अप धीम्या मार्गाच्या सर्व सेवा मुलुंड-माटुंगा दरम्यान अप जलद मार्गाने धावणार आहेत. तसेच मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकावर थांबणार आहेत. माटुंगा स्थानकापासून अप धीम्या मार्गावर लोकल धावणार आहेत. कल्याण येथून सुटणाऱ्या डाऊन जल/अर्ध जलद मार्गाच्या गाड्या निर्धारित थांब्याच्या व्यतिरिक्त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकात थांबणार आहेत. परंतु 15 मिनिटे उशिराने लोकल धावणार असल्याचे सांगण्यात आले आहे.(रेल्वे रुळांशेजारी कचऱ्याला लागलेल्या आगीदरम्यान खोळबंळलेल्या लोकलमध्ये वृद्ध महिलेला आला हृदयविकाराचा झटका)

Tweet:

तसेच शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.49 वाजल्यापासून ते दुपारी 2.48 वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्ध जलद मार्गाच्या गाड्या निर्धारित थांब्यांच्या व्यतिरिक्त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्थानकावर थांबणार असून 20 मिनिटे उशिराने धावणार आहे. ब्लॉकदरम्यान पनवेल-अंधेरी मार्गाच्या सेवा उपलब्ध नसणार आहेत. शिवाजी महाराज टर्मिनस आणि वाशी दरम्यान विशेष उपनगरीय सेव चालवण्यात येणार आहे. ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकासाठी ट्रान्स हार्बर मार्गच्या सेवा सुरु राहणार आहेत.