Satara Engineer Commits Suicide: महावितरण कंपनीत काम करणाऱ्या एका अभियंत्याची कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या
Hanging | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

महाराष्ट्राच्या (Maharashtra) सातारा (Satara) जिल्ह्यातील कोरेगाव (Koregaon) तालुक्यातून सर्वांनाच हादरून टाकणारी बातमी समोर आली आहे. महावितरणमध्ये काम करणाऱ्या एका अभियंत्याने कार्यालयातच आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. सुरज देसाई असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. सुरज देसाई यांनी आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशी करत आहेत. तरुण वयात सुरज देसाई यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्यामुळे संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

सुरज देसाई हे महावितरण कंपनी अभियंता म्हणून कार्यरत होते. नेहमीप्रमाणे ते आज आपल्या कार्यालयात आले होते. पण काही वेळांनी देसाई यांनी कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. कार्यालयातच त्यांनी आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ उडाली. त्यानंतर कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने या घटनेची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली. पोलिसांना सुरज देसाई यांचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. हे देखील वाचा- Aurangabad मध्ये अघोरी प्रकार; 25 वर्षीय व्यक्तीने स्वत:चा गळा चिरुन शिवलिंगावर केला रक्ताचा अभिषेक

याआधी सातारा येथील महाबळेश्वर येथे एका विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सोनल विपुल जाधव असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सोनल हिने आपल्या राहत्या घरात सकाळी दहाच्या सुमारास लोखंडी अॅंगलला गळफास लावून आत्महत्या केली आहे. चौदा महिन्यांची चिमुकली मात्र आईविना पोरकी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली आहे. सोनल यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.