आमदारांची खरेदी विक्रीची माहिती खोटी: कॉंग्रेससने 48 तासांमध्ये पुरावे द्यावेत अथवा माफी मागा: सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
सुधीर मुनगंटीवार । Photo Credits: Twitter

कॉंग्रेस आणि शिवसेनेकडून भाजपा पैशांचं आमीष दाखवत आमदार फोडण्याचा प्रयत्न करत आहे. असा दावा विजय वडेट्टीवार यांनी आज सकाळी केला होता. मात्र हे आरोप सुधीर मुनगंटीवर (Sudhir Mungantiwar) यांनी फेटाळले आहेत. त्यामुळे स्वतःच्या आमदारांवर विश्वास नसल्याने हे वक्तव्य केल्याचं सांगत 48 तासात पुरावे द्या अन्यथा जनतेची माफी मागा असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले आहेत. तर शिवसेनेने त्यांच्या आमदारांना वांद्रे येथील रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले होते मात्र आता त्यांनाही हलवण्यास सुरूवात झाली आहे. कॉंग्रेसने केलेल्या दाव्यानुसार, भाजपाकडून 25-50 कोटी रूपयांची ऑफर देण्यात आली होती. हिरामण खोसकर यांना अशाप्रकारचे आमीष दाखवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे.  इथे वाचा सत्ता स्थापनेपूर्वी  काय आहेत राजकीय घडामोडी?  

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज दिल्लीहून मुंबईत दाखल झाले आहेत. सध्या नितीन गडकरी खाजगी कामासाठी आलो असल्याचं सांगत वरळी येथील राहत्या घरी आहेत. या वेळेस नितीन गडकरी यांच्या निवास स्थानी विनोद तावडे , बावनकुळे,संभाजी निलंगेकर सह काही भाजपा नेते पोहचले आहेत. दरम्यान शिवसेना तयार असेल तर मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

ANI Tweet  

सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू आहेत. मात्र काही वेळ लागेल, लवकरच शिवसेना आणि भाजपा यांचं महायुतीचं सरकार येईल. शिवसेनेच्या आमदारांचीही बैठक खासदार, जिल्हाप्रमुख उपस्थित होते. यानंतर शिवसेना मात्र मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याचं म्हटलं आहे.