Devendra Fadanvis (Photo Credit - Twitter)

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी गेल्या महिन्यात पोलीस भरतीची (Police Recruitment) घोषणा केली होती. राज्यात साडेसात हजार पदांसाठी लवकरच पोलीस भरती प्रक्रिया राबवणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. तसंच गृह विभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सूचना दिल्याचंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले होते. पण अजुनही राज्यभरात पोलिस भरती रखडली आहे. राज्यात अनेक तरुण प्रदीर्घ काळापासून पोलिस भरतीची तयारी करीत आहेत तरी राज्यात पोलिस भरती करण्यात आल्या नाहीत. नांदेडसह (Nanded) अनेक जिल्ह्यातील तरुण या पोलिस भरतींच्या प्रतिक्षेत आहेत तर या भऱतींचा मुहूर्त अजुन न लागल्याने आज नांदेडमध्ये काही विद्यार्थी (Student) आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं.

 

मुक्तिसंग्राम (Marathwada Mukhti Sangram Din)  दिनानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) आज नांदेड (Nanded) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. कार्यक्रमानंतर नांदेडमधील विद्यार्थ्यांनी (Students) घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. गेल्या पाच वर्षांपासून रखडलेली पोलीस (Police) भरती केव्हा सुरु होणार? असा सवाल यावेळी जमा झालेल्या तरुणांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांना विचारला. दरम्यान नांदेड पोलिसांनी (Nanded Police) विद्यार्थ्यांनी सौम्य लाठीचार्ज केल्याचा व्हिडीओ (Video) व्हायरल (Viral) होत आहे. (हे ही वाचा:- Marathwada Mukti Sangram Din: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण, मराठवाड्यासंबंधी मोठी घोषणा)

 

संबंधीत घटनेवर राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी निशाणा साधला आहे. तसेच बेरोजगारी (Unemployment) आणि महागाईच्या मुद्द्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde Fadnavis Government) टीका केली आहे. तरी राज्यातील बेरोजगारी, तरुणांच्या नोकरीचा, पोलिस भरती, शिक्षक भरती हे महत्वाचे प्रश्न कधी सुटतील याकडे बघण महत्वाचं ठरणार आहे.