मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवास्थान मातोश्री उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला सरकार सोडणार नाही- अनिल परब
Anil Parab | (File Photo)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' (Uddhav Thackeray Residence Matoshree) उडवून देण्याची धमकी देणारा फोन आला होता. हा फोन दुबाई येथून आला होता. धमकी देणारा व्यक्ती अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याचा हस्तक आहे किंवा नाही याबाबत माहिती नाही. परंतू, धमकी देणाऱ्यास राज्य सरकार सोडणार नाही, असा गर्भीत इशारा राज्याचे परीवहन मंत्री (State Transport Minister) आणि शिवसेना ( Shiv Sena) नेते अनिल परब (Anil Parab) यांनी दिला आहे. 'मातोश्री' निवासस्थान उडवून देण्याची धमकी देण्याचे वृत्त आल्यानंतर अनिल परब हे पत्रकार परीषदेत बोलत होते.

या वेळी बोलताना अनिल परब म्हणाले की, मातोश्रीवर 3 ते 4 वेळा फोन आला होता. आम्ही पोलीसांमध्ये रीतसर तक्रार केली आहे. पोलीस या प्रकरणाचा योग्य तो तपास करतील. मात्र, कोणत्याही धमकीला आम्ही घाबरत नाही. धमकी देणाऱ्याला सरकार सोडणार नाही, असेही परब या वेळी म्हणाले. (हेही वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' उडवून देण्याची धमकी, दुबई येथून फोन)

काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठाम- विजय वडेट्टीवार

दरम्यान, मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही या फोनबाबत आपाल संताप व्यक्त केला. ते म्हणाले, राजकारण कोणत्या दिशेला चालले आहे याचेच हे द्योतक आहे. केंद्र सरकार दाऊद इब्राहीमचा विषय म्हटले की नेहमीच आक्रमक होते. तर मग इतके दिवस झाले तरी दाऊद अजूनही भारतात कसा आला नाही. त्याची धमकी देण्याची हिंमत होतेच कशी? असा सवाल उपस्थित करतानाच आम्ही मित्रपक्ष म्हणून मुख्यमंत्र्यांच्या पूर्णपणे पाठीशी आहोत, असेही वडेट्टीवार या वेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही- बाळासाहेब थोरात

राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही वडेट्टीवार यांच्याप्रमाणेच प्रतिक्रिया देत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थन पूर्णपणे सूरक्षीत आहे. तिथे चोख सुरक्षा व्यवस्था आहे. त्यांच्या केसालाही धक्का लावण्याची कोणाची हिंमत होणार नाही. काँग्रेस पक्ष मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असेही बाळासाहेब थोरात या वेळी म्हणाले.