मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' उडवून देण्याची धमकी, दुबई येथून फोन
CM Uddhav Thackeray Residence Matoshree | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख यांचे खासगी निवासस्थन 'मातोश्री' (Uddhav Thackeray Residence Matoshree) उडवून देण्याच्या धमकीचा फोन आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दुबई येथून 3 ते 4 वेळा हा फोन आल्याची प्राथमिक माहिती आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने आपण अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Underworld don Dawood Ibrahim) याचा हस्तक असल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray)हे सध्या निवासस्थानातून बाहेर पडले आहेत. मात्र, मातोश्री (Matoshree) परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मोठ्या प्रमाणवर वाढविण्यात आली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ते आतापर्यंत 'मातोश्री' निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात असतात. सध्यास्थितीत या ठिकाणी मोठ्या प्रमाणवर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे.

धमकी देणारा अजून जन्माला यायचा आहे- शंभुराजे देसाई, गृहराज्यमंत्री

राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलता या कथीत धमकीच्या फोनबाबत म्हटले की, मी आगोदर शिवसैनिक आहे. गृहराज्यमंत्री त्यानंतर आहे. आम्ही अशा धमक्यांना घाबरत नाही. मी सध्या माझ्या मतदारसंघातून अधिवेशनासाठी निघालो आहे. त्यामुळे मी अधिक माहिती आमच्या अधिकाऱ्यांकडून घेतो. परंतू, धमकी देणाऱ्यांना मी इतकेच सांगेन की आगोदर आमच्या शिवसैनिकांचा सामना करा. मग, धमकीची भाषा करा. मातोश्री हे आमच्या शिवसैनिकांचे स्पूर्थीस्थान आहे. धमकी देणाऱ्यांना कोणत्याही स्थिती सोडले जाणार नाही, असेही शंभूराजे देसाई म्हणाले.

छातीचा कोट करु 'मातोश्री' सुरक्षीत राहील-अरविंद सावंत

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताा सांगितले की, अशा अनेक धमक्या या आधी अनेकदा आल्या आणि गेल्या. आम्ही धमक्यांना घाबरत नाही. छातीचा कोट करु पण मातोश्री सुरक्षीत राहिले पाहिजे, असे शिवसेना खासदार अरविंद सांवत यांनी म्हटले आहे. सरकार आमचेच आहे धमकी देणाऱ्याची चौकशी केली जाईल, असेही ते या वेळी म्हणाले.

दरम्यान, मंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही धमकीला शिवसैनिक घाबरत नाहीत. मुंबई पोलीसांवर आमचा विश्वास आहे. ते त्यांचे काम करतीलच परंतू, शिवसैनिक म्हणूनही आम्ही धमकी देणाऱ्यांना पाहून घेऊ, असेही पेडणेकर या वेळी म्हणाले.