Anil Parab | (File Photo)

राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) आज (4 नोव्हेंबर) दुपारी 1.30 वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. पत्रकार परिषदेत ते नेमकं कोणत्या विषयांवर बोलणार, याबाबत जनतेला उत्सुकता आहे. महाराष्ट्र सरकार समोर सध्या अनेक आव्हाने, प्रश्न आहेत, त्यातील कोणत्या मुद्द्याला परब हात घालणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सध्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक (Republic TV Editor) अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्या अटकेचा मुद्दा चर्चेत आहेत. त्यावर देशभरातून विविध प्रतिक्रीया उमटत आहेत. तर भाजप नेत्यांनी यावर सडकून टीका करत आणीबीणीसारखी परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पत्रकार परिषदेत अनिल परब या मुद्द्यावर बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही. (कायद्यापेक्षा कुणी मोठं नाही; पोलिसांची कारवाई कायद्यानेच - महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख)

महाविकास आघाडी सरकारवर भाजपकडून होणाऱ्या टीकेला या पत्रकार परिषदेतून प्रत्त्युतर देण्यात येणार का? हे येत्या काही वेळातच स्पष्ट होईल. तसंच इतर कोणत्या मुद्द्यांवर परब पत्रकारांशी संवाद साधणार, हे देखील लवकरच कळेल. (Devendra Fadnavis On Arnab Goswami: सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक; अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीस यांची ट्विटद्वारे टीका)

दरम्यान, आज सकाळी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना त्याच्या मुंबईतील घरातून अटक करण्यात आली. अर्नब गोस्वामी यांना ताब्यात घेताना मुंबई पोलिसांनी गोस्वामी आणि कुटुंबियांना धक्काबुक्की केल्याचे रिपब्लिक टीव्हीने म्हटले आहे. मुंबई पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर भाजप नेत्यांनी टीका केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अमित शाह, किरीट सौमय्या यांच्यासह अनेकांनी काँग्रेस, शिवसेनेवर टीकेचे झोड उठवली आहे. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ठाकरे सरकार बदल्याचे राजकारण करत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तर कायद्यापुढे कोणीही मोठे नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.