Devendra Fadnavis On Arnab Goswami: सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न लोकशाहीसाठी घातक; अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर देवेंद्र फडणवीस यांची ट्विटद्वारे टीका
Devendra Fadnavis | (Photo Credits: PTI)

रिपब्लिक टीव्ही (Republic TV) चे संपादक (Editor) अर्नब गोस्वामी (Arnab Goswami) यांना आज (4 नोव्हेंबर) सकाळी मुंबई पोलिसांनी अटक केली. यांच्या अटकेनंतर भाजप (BJP) नेत्यांनी ट्विटद्वारे आपल्या प्रतिक्रीया नोंदवल्या. विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील महाविकास आघाडी सरकारवर ट्विटद्वारे टीका केली आहे. सरकारविरोधी प्रत्येकाचा आवाज दडपण्याचा शिवसेना आणि काँग्रेस प्रयत्न करत आहे. पण अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. (Arnab Goswami in Maharashtra Police Custody: रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्नब गोस्वामी यांना अटक)

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे." (Sanjay Raut On Arnab Goswami: अर्नब गोस्वामी यांच्या अटकेनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली अशी प्रतिक्रिया)

देवेंद्र फडणवीस ट्विट:

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्नब गोस्वामी यांना मुंबईतील राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी अर्नब गोस्वामी आणि त्यांच्या कुटुंबियांना धक्काबुक्की केल्याचा आरोप अर्नब गोस्वामी यांनी केला आहे. दरम्यान, यावर प्रतिक्रीया नोंदवताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्रामध्ये कायदे पाळले जातात. पुरावे असल्यास पोलिस त्या व्यक्तीवर कारवाई करु शकतात. ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून बदला घेण्यासाठी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही."