महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तसेच उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत (Shiv Sena) जाहीर प्रवेश केला आहे. त्यावेळी शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर हे देखील उपस्थित होते. शिवसेनेकडून याबाबत अधिकृत ट्वीट करत माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, गडाख यांना शिवसेनेत आणण्यात मिलिंद नार्वेकर यांची मुख्य भूमिका राहीली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये अहमदनगरमधील नेवासा विधानसभा मतदारसंघातून क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे उमेदवार असलेले शंकरराव गडाख हे अपक्ष म्हणून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता.
नेवासा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रावादी काँग्रेसच्या पाठिंब्यावर क्रांतिकारी शेतकरी पार्टीचे उमेदवार शंकरराव गडाख हे अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर ते कोणत्या पक्षात प्रवेश करतील? याकडे सर्वांचे संपूर्ण नेवासा तालुक्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकर यांनी 28 ऑक्टोबर रोजी माजी खासदार यशवंतराव गडाख आणि आमदार शंकरराव गडाख यांची सोनई येथील निवासस्थानी भेट घेतली होती. त्यानंतर शंकरराव गडाख यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेत पाठिंब्याचे पत्र दिले होते. हे देखील वाचा- राज ठाकरे जिम व्यावसायिकांना म्हणतात 'काळजी घ्या..सर्व नियमांचे पालन करुन व्यायामशाळा सुरू करा'
शिवसेनेचे ट्वीट-
महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री @GadakhShankarao जी यांनी आज मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे सचिव @NarvekarMilind_ जी उपस्थित होते. pic.twitter.com/0obIZOPVhF
— ShivSena - शिवसेना (@ShivSena) August 11, 2020
शंकरराव यांच्या कार्यकर्तांनी गेल्या काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांच्यासोबत काढलेले जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. कार्यकर्त्यांनी फेसबूक व व्हॉट्सअपवर स्टेटसला ठेवल्यानंतर शंकराव गडाख हे शिवसेनेत दाखल झाल्याची चर्चा संपूर्ण नेवासा तालुक्यात सुरु झाली होती.