राज्य सरकारने जाहीर केलेल्या मुद्रांक शुल्क सवलत (Stamp Duty Discount) कालावधी संपण्यास आता काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे शुल्क सवलतीच्या दरात मुद्रांक (Stamp Duty) खरेदी करण्यासाठी नागरिक नोंदणी कार्यालयात (Stamp Registration Offices) गर्दी करताना दिसत आहेत. राज्य शासनाने जाहीर केल्यानुसार 31 डिसेंबर पर्यंत मुद्रांक (Stamp) 3% शुल्क सवलतीच्या दरात मिळणार आहेत. ही मदत संपण्यासाठी आता केवळ काहीच दिवस बाकी आहेत. त्यामुळे सवलतीचा लाभ मिळविण्यास नागरिक प्राधान्य देत आहेत.
राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक ओमप्रकाश देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार 31 डिसेंबरपूर्वी आगावू नोंदणी शुल्क भरुन पुढच्या चार महिन्यांसठी दस्त नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. तसेच, सवलतीचा लाभही घेता येणार आहे. (हेही वाचा, Real Estate Market सावरण्यासाठी राज्य सरकारचा दिलासा, फ्लॅटवरील मुद्रांक शुल्क 31 डिसेंबर पर्यंत कमी ठेवण्याचा निर्णय)
दरम्यान, नागरिकांची गैरसोय होऊ नये आणि सवलतीच्या दरात अधिकाधिक मुद्रांक खरेदी करता यावेत यासाठी सुटीच्या दिवशीही दस्त नोंदणी कार्यालये सुरु असणार आहेत. येत्या 25,26 डिसेंबरला जोडून सुटी येत आहे. 25 तारखेला महिन्यातील चौथा शनिवार तर 26 डिसेंबरला नाताळ आहे. त्यामुळे जोडून सुटी येत आहे. असे असले तरी नागरिकांच्या सोईसाठी 25 आणि 26 डिसेंबरला सुटीच्या दिवशीही दस्त नोंदणी कार्यालये सुरु ठेवण्यात येणार आहेत. प्रामुख्याने अधिक खप असलेल्या म्हणजे पुणे, मुंबई आणि ठाणे या ठिकाणी कार्यालयांच्या वेळाही वाढविण्यात येणार आहेत.या ठिकाणी दस्त नोंदणी कार्यालये सकाळी 7.30 ते रात्री 8.45 पर्यंत दोन सत्रांत सुरु राहतील.
दरम्यान, आधीच्या मुद्रांक शुल्काचा विचार करता 5% मुद्रांक शुल्क आणि 1% नागरी कर असे मिळून मुद्रांक खरेदीसाठी 6% शुल्क आकारले जात असे. तर ग्रामिण भागात याच मुद्रांकासाठी 4% शुल्क आणि 1% जिल्हा परिषद अधिभार (सेस) असे मिळून 5% मुद्रांक शुल्क आकारले जात असे. मात्र, राज्य सरकारने दिलेल्या सवलतीमुळे शहरी भागात 2% तर ग्रामिण भागात 1% मुद्रांक शुल्क दरात सवलत दिली जा